Israel ने हमासच्या 100 दहशतवाद्यांना उडवले; शाळेत सुरु होते कमांड सेंटर

139

इस्रायल (Israel) हमासच्या दहशतवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. ताज्या हवाई हल्ल्यात 100 हून अधिक हमासचे अतेरिकी ठार झाले आहेत. हे सर्व जण शाळेत नमाज पठण करत होते. इस्रायलने पूर्व गाझामधील या शाळेला लक्ष्य करून हा हल्ला केला. ही शाळा नसून दहशतवाद्यांची कमांड पोस्ट असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

इस्रायलच्या (Israel) सैन्याने, IDF ने हमास कमांड पोस्टवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. या कमांड पोस्टची स्थापना गाझा शहरातील दराज येथील अल-ताबेन स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी केली होती आणि ते इस्रायलविरुद्ध काम करत होते. आयडीएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ला करण्यापूर्वी नागरिकांना हानी पोहोचण्याची शक्यता कमी करण्यासाठी अचूक शस्त्रे वापरून अनेक हल्ले केले गेले. आयडीएफने हमासवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे पद्धतशीरपणे उल्लंघन केल्याचा, नागरी आश्रयस्थानांमधून काम करण्याचा आणि लोकसंख्येचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा Mumbai Crime : मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांत वाढ; ५ महिन्यांत ५०७ गुन्हे दाखल)

हम्सा संचालित नागरी संरक्षण एजन्सीचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले की, “विस्थापित पॅलेस्टिनी लोक राहत असलेल्या शाळेवर तीन इस्रायली (Israel)  रॉकेट आदळले. या हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेल्याचे गाझा सरकारी माध्यम कार्यालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाले आहेत.

हमासने एका निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायली हल्ल्यात विस्थापित पॅलेस्टिनींना नमाज अदा करत असताना लक्ष्य करण्यात आले. याआधीही इस्रायलने पॅलेस्टिनी निर्वासितांनी भरलेल्या दोन शाळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून डझनभर जखमी झाले आहेत. त्याचवेळी 4 ऑगस्ट रोजी गाझा येथील हमामा शाळेला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी इस्रायलने (Israel) अल-मुग्राबी स्कूलवर रॉकेट डागले होते. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. या शाळांमध्ये हमासचे दहशतवादी आहेत, ते कमांड सेंटर म्हणून काम करत असल्याचे इस्रायलचे स्पष्टपणे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करून शस्त्रांनी हल्ला केला होता. या काळात सुमारे 1200 लोक मारले गेले आणि शेकडो स्त्री-पुरुषांना कैद केले गेले. त्यांच्यावर हल्ला, बलात्कारासारख्या अमानुष घटना घडल्या होत्या. यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनवर कारवाई सुरू केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.