सॅम माणेकशॉ यांच्यानंतर लष्करप्रमुख म्हणून गाजलेले जनरल Gopal Gurunath Bewoor

149
सॅम माणेकशॉ यांच्यानंतर लष्करप्रमुख म्हणून गाजलेले जनरल Gopal Gurunath Bewoor

जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर (Gopal Gurunath Bewoor) हे भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी आठवे लष्करप्रमुख म्हणून कामगिरी बजावली आहे आणि नंतर डेन्मार्कमध्ये भारतीय मुत्सद्दी म्हणून काम केले आहे. जनरल गोपाल यांचा जन्म ११ ऑगस्ट १९१६ रोजी सिवनी येथे कन्नड देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.

त्यांचे शिक्षण डेहराडून येथील कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज येथे झाले. पुढे ते इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये सामील झाले. १९३४ मध्ये त्यांची नियुक्ती कॅडेट कॅप्टन म्हणून करण्यात आली. यावेळी त्यांनी लॉर्ड रॉलिन्सनची ट्रॉफीही जिंकली.

(हेही वाचा – No Boxing in Olympics : लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून मुष्टियुद्ध हद्दपार?)

त्यांनी भारतमातेची चार दशके प्रदीर्घ सेवा केली. जनरल बेवूर यांनी दुसरे महायुद्ध जवळून पाहिले. १९६५ मध्ये तसेच १९७१ च्या युद्धादरम्यान दक्षिणेकडील कमांडची प्रभावीपणे कमांडिंग केली केली. तसेच पाकिस्तानमधील भारतीय लष्कराच्या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. (Gopal Gurunath Bewoor)

विशेष म्हणजे जानेवारी १९७३ मध्ये त्यांची फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यानंतर लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि सैन्यातून निवृत्तीनंतर १९७९ पर्यंत डेन्मार्कमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले. १९७२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.