ISIS Pune Module च्या प्रमुख सदस्याला अटक, ‘या’ दहशतवाद्यावर होते ३ लाखांचे बक्षीस

151
ISIS Pune Module च्या प्रमुख सदस्याला अटक, 'या' दहशतवाद्यावर होते ३ लाखांचे बक्षीस

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) च्या पुणे मॉड्युलच्या (ISIS Pune Module) प्रमुख सदस्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. रिझवान अब्दुल हाजी अली असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून एनआयएकडून त्याच्यावर ३ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलीच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते.

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळ काढल्यापासून तो फरार होता. दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असलेल्या अलीने पुणे आयएसआयएस मॉड्युलच्या (ISIS Pune Module) इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल ठिकाणे त्यांच्या लक्ष्यावर होती. अटक करण्यात आलेल्या अलीच्या ताब्यातून पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत. पुणे इसिस मॉड्युलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलिस आणि एनआयएने यापूर्वी अटक केली आहे.

(हेही वाचा – Bangladesh Interim Government : बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान शरद पवार यांचे मित्र!)

काय आहे पुणे इसिस मॉड्यूल प्रकरण?

एनआयएने जुलै २०२३ मध्ये पुण्यात शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि इसिसशी संबंधित साहित्य जप्त केल्याप्रकरणी एकूण ११ आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत. या वर्षी मार्चमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवान अलीसह अन्य तीन आरोपींची नावे होती. सर्व आरोपी प्रतिबंधित दहशतवादी संघटना, इसिसचे सदस्य होते आणि एनआयए नुसार, संघटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या कटाचा एक भाग म्हणून पुणे (ISIS Pune Module) आणि आसपास दहशतवाद पसरवण्याच्या योजनांमध्ये त्यांचा सहभाग होता. हे आरोपी गुप्त कम्युनिकेशन ॲप्सद्वारे त्यांच्या परदेशातील हँडलरच्या संपर्कात असल्याचेही आढळून आले. ते सशस्त्र दरोडे आणि चोरी करून निधी गोळा करत होते आणि त्यांच्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांच्या हस्तकांकडून पैसे घेत होते. या व्यक्तींनी पुण्यातील कोंढवा येथे आयईडी फॅब्रिकेशनचे प्रशिक्षण घेतले होते आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. त्यांनी पश्चिम घाटातील संभाव्य लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील शहरांमध्ये ठिकाणे तपासली, असे एनआयएने सांगितले. एनआयएच्या निष्कर्षांनुसार, दहशतवादी हल्ल्यांसाठी स्वत:ला तयार करताना आरोपींनी शूटिंगचे प्रशिक्षणही घेतले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.