Uddhav Thackeray म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या बाणाचा नेम चुकला; भाजपावर टीका करताना श्रीरामाचा अवमान

176

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताह निमित्ताने शनिवार, १० ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात सभा आयोजित केली होती. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांच्याकडून थेट प्रभू श्रीरामाचा अवमान झाला. ज्या प्रभू श्रीरामाचा बाण त्रिकांडात कुठेही लपलेल्या राक्षसाचा वेध घ्यायचा, अशा श्रीविष्णू अवतार श्रीरामाचा ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रभूश्रीरामाचा बाण चुकला’, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून प्रभू श्रीरामाचा अवमान झाला.

(हेही वाचा Bangladesh Interim Government : बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान शरद पवार यांचे मित्र!)

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

अयोध्येमध्ये आदर्श घोटाळा झाला सैन्य दलाची जमीन खाल्ली, आमच्या हातात घंटा आणि म्हणतोय जय श्रीराम आणि तिकडे लोढा अयोध्येत  बिल्डिंग बांधतोय, याच्यासाठी आम्हाला राममंदिर हवे होते का, याच्यासाठी कारसेवकांनी रक्त सांडले का? ळोधाचा टॉवर बांधायला कारसेवकांनी रक्त सांडले का?  मंदिर वही बनायेंगे, मंदिर वही बनायेंगे म्हणत होतात, मंदिर बनले, पण त्यानंतर तुम्ही जो शो केला, तुम्हाला वाटले आता आपल्यासमोर कुणी उभेच राहू शकत नाही, पण प्रभू रामचंद्राने सुद्धा जो बाण मारला तो थोडक्यात चुकला. नाहीतर बरोबर वर्मी लागला होता, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा उत्तर प्रदेशातील लोकसभेत जो निकाल लागला त्यावर प्रभू श्रीरामाचा बाणाचा नेम चुकला असे सांगत श्रीरामाचा अवमान केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.