Raigad Police Recruitment: पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत विद्यार्थ्यांचा गैरप्रकार उघड; विद्यार्थ्यांची नावे आली समोर

165
Raigad Police Recruitment: पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत विद्यार्थ्यांचा गैरप्रकार उघड; विद्यार्थ्यांची नावे आली समोर
Raigad Police Recruitment: पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत विद्यार्थ्यांचा गैरप्रकार उघड; विद्यार्थ्यांची नावे आली समोर

राज्यात पोलिस भरतीची (Raigad Police Recruitment) परिक्षा सुरू आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. मात्र रायगड जिल्हयात झालेल्या लेखी परीक्षेत 6 विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचं उघड झालं आहे. चक्क कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप डिव्हाईस बसवून या विद्यार्थांनी परीक्षा केंद्र गाठले आणि परीक्षा देण्यास सुरूवात केली. मात्र केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांची झडती घेतली. यामध्ये तब्बल सहा विद्यार्थ्यांकडे या चिप आढळुन आल्या आणि अखेर या विद्यार्थ्यांचा पर्दाफाश झाला.

एकूण 391 पदांकरीता ही पोलिस भरती प्रक्रिया सूरु आहे. यासाठी राज्यातून एकूण 4747 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. अलिबागमधील एका परीक्षा केंद्रावर तब्बल सहा विद्यार्थ्यांना परीक्षेतील उत्तर मिळविण्यासाठी सोबत डिव्हाईस घेऊन पेपर देत असताना रायगड पोलिसांनी रंगेहाथ पकडली आहे. हे विदयार्थी कानात डिव्हाईस घालुन बसले होते मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत या सहा जणांना पूर्वतयारी निशी पकडले आहे. (Raigad Police Recruitment)

विद्यार्थ्यांची नावे (Raigad Police Recruitment)

1) रामदास जनार्दन ढवळे – बीड जिल्हा
2) दत्ता सुभाष ढेंबरे – बीड जिल्हा
3) ईश्वर रतन जाधव – बीड जिल्हा
4) गोरख गंगाधर गडदे – बीड जिल्हा
5)सागर धरमसिंग जोनवाल – औरंगाबाद
6) शुभम बाबासाहेब कोरडे – बीड जिल्हा

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.