Crime News: मेळघाटात सागवान तस्करी उघड, आंतरराज्यीय टोळी गजाआड

129
Crime News: मेळघाटात सागवान तस्करी उघड, आंतरराज्यीय टोळी गजाआड
Crime News: मेळघाटात सागवान तस्करी उघड, आंतरराज्यीय टोळी गजाआड

मेळघाटातील सूसर्दा वनपरिक्षेत्रात सागवान तस्करी (Crime News) शनिवारी उघड झाली आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून फरार तीन आरोपींचा शोध सुरू आहे. सुसर्दा वनपरिक्षेत्रातील बिबामल वर्तुळात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक प्रकरणात भारतीय वनअधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(हेही वाचा –ठाण्यात झालेल्या राड्यावर CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले?)

या राखीव वनखंडात सागवान तस्करांच्या टोळीने अवैध मार्गाने प्रवेश करुन सागवान झाडे तोडली. या लाकडाची मध्यप्रदेश राज्यातील बर्‍हाणपूर येथे तस्करी करण्यात आली आहे. तपासादरम्यान अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वनगुन्ह्यातील आरोपी सचिन भागसिंग पटोरकर (रा. बिबामल), चेतन चंपालाल जावरे (रा. खारी), सरताप दशरथ भामर (रा. भवर) नुकदार भवरसिंघ अहिर्‍या (रा. भवर, राधे मोरे (रा. घाकबारा, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

(हेही वाचा –Doctor Murder: डॉक्टर तरुणीची बलात्कार करून केली हत्या; इयरबड्सच्या तुकड्यावरुन पकडला आरोपी)

दुनियासिंघ मोरेय (रा. चाकबारा), महेश पासि (रा. बाटा), अंकित पासि (रा. चाकबारा) हे तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन भागसिंग पटोरकर याला धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रिम सैनी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आयुष कृष्णा, वन परिक्षेत्र अधिकारी पी. जी. सातारकर आणि पथकाने केली आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.