Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल  

172
Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल  
Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल  

उबाठा गटाच्या (UBT Group) वतीने शनिवारी (११ ऑगस्ट) रोजी ठाण्यात मेळावा पार पडला. यावेळी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षावर तोफ दागली. या सर्व प्रश्नांना शिवसेनेने (रविवारी ११ ऑगस्ट) रोजी प्रतिउत्तर दिले. यावर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जो नवस केला होता तो पूर्ण झाला आहे. मातोश्रीला लोकांच्या चरणी लीन केले. राहुल गांधी यांची भेट घडवून त्यांचा चरणी लीन झाले आहेत. अशा शब्दात शिरसाटांनी बोचरी टीका केली. संजय राऊत मराठी राहिलेच नाही, त्याची कधीच सुनथा झालेली आहे, असा खोचक टोला संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊत यांना लगावला.

(हेही वाचा – Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा देण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी; हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाची मागणी)

पुढे संजय शिरसाट म्हणाले राऊतांना,तुम्ही काय चित्रपट काढता? दलाल नं १ हा चित्रपट तुमच्यासाठी मी काढणार आहे. लाडकी बहिणीच्या तोंडात घास जावू नये यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. टीका करण बंद करा, रोज जे चालले आहे ते फार किळसवाणे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं कधीही झाले नाही. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे, अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली. 

(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मविआच्या ‘त्या’ प्रश्नाला उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं उत्तर; म्हणाले…  )

उद्धव ठाकरे तुम्ही शिवाजी महाराज आहात का?

संजय शिरसाट यांनी संजय राऊतांसोबत उध्दव ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधला. उद्धव ठाकरे तुम्ही शिवाजी महाराज आहात काय? असा सवाल शिरसाटांनी केला. तुम्ही ऐतिहासिक बोलू नका, खोटं बोलण्याची हद्द असते अशी टीकाच त्यांनी ठाकरेंच्या अमित शाहांवरील टीकेवर केली. दिल्लीवारी करून आल्यावर त्यांना काहीही सुचत आहे, दिल्लीत शेपूट खाली घालून आलेत अशा शब्दात शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी दोन महिने थांबा म्हणतात तर त्या पुढे त्यांनी ० लावावा, म्हणजे २० वर्ष होईल, कार्यकर्ते दूर जाऊ नये म्हणून राऊत आणि ठाकरेंचे भाष्य आहे अशी प्रतिक्रिया दिली.  

हेही वाचा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.