Ratnagiri देऊडमधील कातळशिल्प ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित!

132
Ratnagiri देऊडमधील कातळशिल्प 'संरक्षित स्मारक' म्हणून घोषित!
Ratnagiri देऊडमधील कातळशिल्प 'संरक्षित स्मारक' म्हणून घोषित!

राज्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्य सरकारने रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील देऊड कातळशिल्प ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते. ते संरक्षित स्मारक करण्याची घोषणा शासनाने केली होती. यासंदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने अखेर ‘संरक्षित स्मारक’ म्हणून हे कातळशिल्प जाहीर केल्याचे शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. (Ratnagiri)

३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित
देऊड येथे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आढळले आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसांचे चित्र रेखाटण्यात आली आहेत. एकूण १० बाय १० चौरस मीटर असे एकूण १०० चौरस मीटर इतके आहे. पूर्वेला ५, पश्चिमेला ५, दक्षिणेला ५ आणि उत्तरेला ५ मीटर जागा आहे. कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली. (Ratnagiri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.