मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकून मारल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे ठाण्याकडे जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी नारळ, शेण आणि टोमॅटो फेकून मारले होते. ठाण्यातील (Thane) या राड्यानंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मोठं विधान केलं आहे. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची, असं ते म्हणाले आहेत.
“जिथे जाल तिथे उत्तर देणार”
अविनाश जाधव म्हणाले, “राज ठाकरे यांच्या नादाला लागाल तर जशास तसे उत्तर देणार, जिथे जाल तिथे उत्तर देणार. केसेस घ्यायला आम्ही घाबरत नाही. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची. आम्ही सकाळ पासून तयारीत होतो ते रात्री आले. उद्धव ठाकरे कधीही विसरणार नाही.” (Thane)
राऊतांवर निशाणा
“संजय राऊत हे सकाळी उठून सुपाऱ्या वाजवत असतो. संध्याकाळी सेटल मेन्ट करणारा हा माणूस, उद्धव ठाकरे जिथे गेले असते तिथे आम्ही गेलो असतो. हा मर्द गडकरी रंगायतन येथे वर बसला होता. तुमचा मर्द शेपूट लपून बसला होता. तुम्ही 5 उतरवले तर आम्ही 500 रस्त्यावर उतरू, तुमच्या घरात देखील मूल बाळा आहेत. आमच्यात कुटुंबियापर्यंत जाण्याची संस्कृती नाही.” (Thane)
“माझं एक ऑफिस पाडाल तर मी तुमचे चार ऑफिस फोडणार”
“तुम्ही माझं एक ऑफिस पाडाल तर मी तुमचे चार ऑफिस फोडणार. माझ्या एका कार्यकर्त्याला मारले तर तुमच्या चार कार्यकर्त्याला मारणार, यांचे बॅनर आम्ही रात्रीच फाडले असते. मर्द असाल तर या समोर, मी उत्तर दिले आहे. राजन विचारे यांनी मला उत्तर दिले तर तशाच तसे उत्तर दिले जाईल विचारे साहेबांनी माझ्या नादी लागू नये. जितेंद्र आव्हाड यांना मस्करीत घ्यायचे असते. मी घरा घरा मध्ये जाऊन काम केले आहे आम्ही उत्तम काम केले आहे. या निवडणुकीत आम्ही गाडणार म्हणजे गाडणार.” असंही अविनाश जाधव म्हणाले. (Thane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community