Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर-डीजेचे ‘विघ्नहरण’ होणार

121
Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर-डीजेचे ‘विघ्नहरण’ होणार
Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर-डीजेचे ‘विघ्नहरण’ होणार

गेल्यावर्षी गणपती मिरवणुकींना गालबोट लागल्याचे दिसुन आले होते. लेझरमुळे अनेक भाविकांच्या डोळ्यांना इजा झाली. शिवाय, डीजेमुळे देखील बहिरेपणा आल्याची प्रकरणे समोर आली होती. यंदा असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्तालयाने दिला आहे. कोणत्याही मंडळाला डीजे वाजविण्यासदेखील परवानगी मिळणार नाही. त्यामुळे यंदा लेझरसह कर्णकर्कश आवाजाचे ‘विघ्नहरण’ होणार आहे. (Ganeshotsav 2024)

गुन्हे नोंद असलेल्या मंडळांना अगोदरच ‘वॉर्निंग’

नाशिक पोलिस आयुक्तालयाने पोलिस ठाणेनिहाय गणेशोत्सव मंडळांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांनी नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या मंडळांना अटी-शर्तींसह परवानगी देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विशेष शाखेमार्फतही यापूर्वी गुन्हे नोंद असलेल्या मंडळांना अगोदरच ‘वॉर्निंग’ देण्यात येणार आहे. (Ganeshotsav 2024)

लेझर लाइट बसविण्यावरही पोलिस निर्बंध लागू करणार

पोलिसांनी बंदोबस्तासह मंडळांच्या परवानगीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. यंदाही नेहमीप्रमाणे कोणत्याही मंडळाला डीजे लावण्यास परवानगी नसेल. शिवाय यंदा लेझर लाइट बसविण्यावरही पोलिस निर्बंध लागू करणार आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पण, नियमांत साजरा करण्यासाठी नियमावली करून मंडळांची बैठक घेत त्यांना सूचित करणार असल्याचे आयुक्तालयाने सांगितले. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.