DCM Devendra Fadnavis :अंधेरी पश्चिम येथील वीस वर्षे रखडलेला बसेरा झोपु गृहप्रकल्प अखेर लागणार मार्गी

DCM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर प्रकल्पाला मिळाली गती

175
विधानसभा उमेदवार यादीमध्ये Devendra Fadnavis यांचाच वरचष्मा

अंधेरी (पश्चिम) येथील ‘बसेरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थे’चा तब्बल वीस वर्षे रखडलेला गृहप्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. 2003 सालच्या सर्वेक्षणानुसार बनवलेले परिशिष्ट -2 बोगस असल्याने रद्द करून नवीन बायोमेट्रिक सर्वेक्षणानुसार परिशिष्ट -2 नव्याने बनवून प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत. अंधेरीत (पश्चिम) चे भाजप आमदार अमित साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश आले असून ला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना त्यांची हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे साटम यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : ४० सुवर्ण पदकांसह अमेरिकेनं टाकलं चीनला मागे )

यासंदर्भात माहिती देताना आमदार साटम म्हणाले की, बसेरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परिशिष्ट -2 बनवताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती. परिशिष्टातील झोपडीधारक आणि प्रकल्प स्थळी राहणारे झोपडीधारक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत होती. त्यामुळे या परिशिष्टात बोगस मंडळी मोठ्या संख्येने घुसवलेली असल्याने जुन्या परिशिष्टानुसार प्रकल्प न राबवण्याची मागणी शासनाने मान्य केले आहे. (DCM Devendra Fadnavis)

नेमकं प्रकरण काय आहे?
मौजे विलेपार्ले, अंधेरी (पश्चिम) येथील बसेरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुर्नविकासाच्या अनुषन्गाने विकासकाने परिशिष्ट 2 तयार करून 766 पात्र झोपडपट्टी धारकांची यादी सादर केली होती. मात्र परिशिष्ट 2 ला स्थानिकांचा विरोध आणि इतर कारणांमुळे योजना रखडली होती. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा- Neeraj Chopra Future Plans : पॅरिसमधील रौप्य पदकानंतर नीरजला पुढे ‘हे’ करायचंय!)

2019 पासून साटम यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न
2019 मध्ये बसेरा झोपू योजनेतील लोकांनी माझ्याकडे येऊन चुकीच्या पद्धतीने परिशिष्ट 2 कसे बनविले गेले त्याची व्यथा मंडळी. त्यानंतर हा विषय विधानसभेत आणि झोपू प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करून मांडला. माझ्या मागणीनंतर नोव्हेंबर 2019 मध्ये नवीन बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मार्च 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्या अहवालात विविध त्रुटी जसे कि मृत पावलेल्या व्यक्तींच्या नोंदी, खरेदी विक्री व्यवहार झालेल्या नोंदी आणि बोगस नावे तसेच निष्कासित केलेली घरे याबाबतच्या माहिती निदर्शनास आली. त्यामुळे झोपू प्राधिकरणाने जुलै 2024 मध्ये ही योजना राबविण्यायोग्य नसल्याचे सांगून ती सुरवातीपासूनच अवैध असल्याचे जाहीर करणारा आदेश काढला, असे साटम यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis)

विशेष बाब म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मान्यता

या योजनेचा विषय मी विधानसभेत लावून धरला. त्यावर उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशष बाब म्ह्णून परिशिष्ट रद्द करून नव्याने बनविण्याचे जाहीर केले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अमित साटम यांच्या पुढाकाराने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात या योजनेला शासनाने विशेष बाब म्हणून नवीन बायोमेट्रिक सर्वेक्षणानुसार नवीन परिशिष्ट 2 बनविण्यास मान्यता दिल्याचे झोपू प्राधिकरणाला जुलै 2024 मध्ये कळविण्यात आले आहे, असे साटम यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा- Mumbai Metro 9 : विरार लोकलची गर्दी कमी होणार? कशी आहे मेट्रो 9 ची मार्गिका? वाचा सविस्तर…)

प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध – साटम

बसेरा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी मी वारंवार विधानसभेत लक्षवेधी मांडल्या आहेत. बसेरा प्रकल्पाच्या विकासकाने 20 वर्षे काही काम केले नाही. त्याला प्रकल्पातून बाहेर काढण्यात आले आहे. प्रकल्पातील रहिवाशांना सोबत घेऊन दोन दशके रखडलेला बसेरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.