Neeraj Chopra Future Plans : पॅरिसमधील रौप्य पदकानंतर नीरजला पुढे ‘हे’ करायचंय!

138
Neeraj Chopra Brand Value : नीरज चोप्राचं ब्रँड मूल्य ३३५ कोटींच्या दरात, हार्दिक पांड्यालाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra Future Plans) रौप्य पदक पटकावलं. ८९.४५ मीटर ही हंगामातील सर्वोत्तम फेक नोंदवूनही नीरज पाकिस्तानच्या नदीम अरशदपेक्षा मागे राहिला. कारण, नदीमची फेक ९२.९७ मीटर अशी ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करणारी होती. नीरजला गेले काही दिवस दुखापतींनी सतावलं होतं. त्यामुळे तो मोजक्याच स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. सराव आणि स्पर्धांचं नियोजन करत तो खेळला. अखेर त्याने रौप्य पटकावलं. भारतासाठी पॅरिसमधील ही सर्वोत्तम कामगिरीच होती. कारण, भारताला इतर मिळालेली पाचही पदकं की कांस्य आहेत.

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : ४० सुवर्ण पदकांसह अमेरिकेनं टाकलं चीनला मागे )

आता पॅरिसमधील रौप्य पदक मिळवलेल्या नीरजला पुढे एक गोष्ट खुणावतेय ती म्हणजे भारतात जगातील अव्वल खेळाडूंबरोबर खेळायला मिळणं. याचा अर्थ भारतात ॲथलेटिक्सची एखादी मोठी स्पर्धा व्हावी असं त्याला वाटतंय. आताही ऑलिम्पिकमध्ये जागतिक दर्जाचे ज्युलियन वेबर, याकुब वादजे, ज्युलियस येगो आणि अँडरसन पीटर्स यांच्याशी त्याने मुकाबला केला. आता हा मुकाबला भारतात व्हावा असं नीरजला वाटतं. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने या भावना व्यक्त केल्या आहेत. (Neeraj Chopra Future Plans)

‘भारतातील प्रेक्षकांसमोर जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी दोन हात करण्याचं माझं स्वप्न आहे. भारतीय प्रेक्षकांसमोर मला जिंकायचंय. लवकरच भारतात अशी एखादी मोठ्या दर्जाची स्पर्धा होईल, असा माझा विश्वास आहे,’ असं नीरज म्हणाला. (Neeraj Chopra Future Plans)

 त्याचबरोबर स्वत:च्या खेळात सुधारणा घडवून आणण्याविषयीही तो जागरुक आहे. ‘नवीन हंगाम जवळ जवळ सुरू झाला आहे. त्यामुळे सरावाची पद्धत आणि तंत्र मला लगेचच बदलता येणार नाही. पण, काही गोष्टीत सुधारणा हवी आहे. ती घडवून आणायची आहे. भाल्याची फेक आणि तेव्हाचा भाल्याचा कोन यात सुधारणा हवी आहे. तर ९० मीटरचं लक्ष्य मी पार करू शकेन. या सुधारणा मी येत्या दिवसांत नक्की घडवून आणेन,’ असं नीरज ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना म्हणाला. (Neeraj Chopra Future Plans)

 स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू ऑलिम्पिक समारोपात ध्वजवाहकाचा मान मिळवतात, अशी परंपरा आहे. पण, यंदा रौप्य पदक पटकावूनही नीरजने तो मान शेवटचं ऑलिम्पिक खेळणाऱ्या पी आर श्रीजेशला देऊ केला. श्रीजेश आणि मनू भाकेरचं त्याने कौतुक केलं. ‘२ दशकं देशाची सेवा करून श्रीजेश निवृत्त होत आहे. दुसरीकडे मनूने इतक्या लहान वयात यश मिळवलंय. ५० वर्षांचे खेळाडूही ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले मी पाहिले. त्यामुळे मनूचं भविष्य उज्ज्वल आहे हे नक्की,’ असं नीरज म्हणाला. (Neeraj Chopra Future Plans)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.