Pooja Khedkar यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

171
Pooja Khedkar यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
Pooja Khedkar यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अटकपूर्व जामिनावरील आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

(हेही वाचा –Mumbai Metro 9 : विरार लोकलची गर्दी कमी होणार? कशी आहे मेट्रो 9 ची मार्गिका? वाचा सविस्तर…)

नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. युपीएससीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. (Pooja Khedkar)

(हेही वाचा –Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर-डीजेचे ‘विघ्नहरण’ होणार)

या प्रकरणाची सुनावणी 9 ऑगस्टला पार पडणार होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाकडून या सुनावणीसाठी 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार आज दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील सिध्दार्थ लुथरा यांनी पूजा खेडकर यांची बाजू मांडली. तर यूपीएससीकडून नरेश कौशिक यांनी बाजू मांडली. यावेळी नरेश कौशिक यांनी पूजा खेडकर या अवैध मार्गाने आयएएस व्यवस्थेत आल्या. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर कोर्टाने खेडकर यांच्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pooja Khedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.