उत्तर भारतातल्या दिल्ली शहरात आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून तुम्हाला मटर कुलचा (Matar Kulcha) सहज खायला मिळेल. पंजाबी स्टाईलच्या या फूड डिशचा जो एकदा आस्वाद घेईल तो या डिशचा नक्कीच चाहता होऊन जाईल.
उत्तर भारतात लोक बहुतेक वेळा मटर कुलचा ही डिश घरीसुद्धा बनवून खातात. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या मटर कुलचाची चव घरी तयार केलेल्या रेसिपीला येत नाही अशी तक्रार अनेकजण करतात. तुम्हीसुद्धा त्या लोकांपैकीच एक असाल, तर आज आम्ही तुम्हाला मटर कुलचाची (Matar Kulcha) अशी रेसिपी सांगणार आहोत जी ट्राय केल्यावर घरातली सगळी माणसं तुमच्या कुकिंग स्किल्सचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.
(हेही वाचा – Pooja Khedkar यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!)
मटर कुलचा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
कुलचासाठी लागणारं साहित्य
मैदा – अडीच वाट्या
दही – १/२ कप
बेकिंग सोडा – १/४ टीस्पून
तेल – २ चमचे
मीठ – चवीनुसार
मटरसाठी लागणारं साहित्य
पांढरे वाटाणे – १.२५ कप
जिरे – १/२ टीस्पून
धणे पावडर – १ टीस्पून
आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
जिरे पावडर – १ टीस्पून
आमचूर पावडर – १/२ टीस्पून
लाल तिखट – १/२ टीस्पून
गरम मसाला – १/२ टीस्पून
तेल – १ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
जलजीरा चटणीसाठी लागणारं साहित्य
पुदिन्याची पानं – ३/४ कप
जिरे – १ टीस्पून
बडीशेप – १ टीस्पून
चिंचेचं पाणी – १/४ कप
मोठी वेलची – १
सुकी लाल मिरची – १
हिंग – चिमूटभर
काळं मीठ – १ टीस्पून
काळी मिरी – १/२ टीस्पून
आमचूर पावडर – १/२ टीस्पून
मीठ – चवीनुसार
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis :अंधेरी पश्चिम येथील वीस वर्षे रखडलेला बसेरा झोपु गृहप्रकल्प अखेर लागणार मार्गी)
मटर कुलचा तयार करण्याची कृती
मटर कुलचा (Matar Kulcha) तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण मटर करी तयार करायला हवी. त्यासाठी सफेद वाटाणे घेऊन ते ८-९ तास पाण्यात भिजत ठेवा. वाटाणे व्यवस्थित भिजले की, त्यानंतर ते वाटाणे कुकरमधून चांगले शिजेपर्यंत शिट्या काढून घ्या. वाटाणे कुकरमध्ये शिजायला ठेवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी, हळद आणि मीठ घाला. साधारणपणे कुकरच्या ४-५ शिट्या झाल्यावर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यावर त्यातले वाटाणे बाहेर काढा. वाटाण्यातलं अतिरिक्त पाणी काढून टाका आणि हलक्या हाताने स्मॅश करा.
त्यानंतर मिक्सरच्या एका लहान भांड्यामध्ये, जलजीरा चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य एकत्र करा आणि त्यात थोडं पाणी घालुन बारीक वाटून घ्या. आता एका भांड्यामध्ये तेल काढून ते मंद आचेवर गरम करा. तेल थोडं गरम झालं की त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की त्यात आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये मटर करी तयार करण्यासाठी वर सांगितलेलं साहित्य घाला आणि थोडा वेळ तळून घ्या. त्यानंतर मग त्या भांड्यात उकडलेले वाटाणे घालून मसाले चांगले एकजीव करा आणि ४-५ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या. वाटाणे चांगले शिजले की मग त्यात जलजीरा चटणी घालुन मिक्स करा आणि आणखी थोडा वेळ शिजू द्या. थोड्या वेळाने गॅस बंद करा आणि शिजलेले मटार एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.
आता आपण कुलचा (Matar Kulcha) बनवण्याची तयारी सुरू करुया. मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा काढून घ्या. त्यामध्ये दही आणि इतर साहित्य घालून एकजीव करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्या. कुलचासाठी तयार केलेलं हे पीठ अर्धा तास झाकून बाजूला ठेवा. अर्ध्या तासानंतर पिठाच्या लहान लहान गोळ्या तयार करून घ्या. यानंतर नॉन-स्टिक तव्यावर थोडं तेल घालून कुलचा टाका. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या. तुमचा कुलचा तयार आहे. याच पद्धतीने सगळे कुलचे तयार करा आणि कुलचा मटार सोबत एका डिशमध्ये सर्व्ह करा आणि गरमा गरम मटर कुलचाचा आस्वाद घ्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community