समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार

164
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार

मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) खेळखंडोबा केल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आता महाराष्ट्रात काँग्रेसची वाट लावण्याची तयारी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले आहे. लोकसभेत सपाला ३७ जागांवर विजय मिळाला होता. हा विजय सपाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी, सपाचे सर्वाधिक ३५ खासदार निवडून आले होते.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची चांगली गट्टी जमली असल्याचे दिसून आले. मात्र, राहुल-अखिलेश यांची जोडी कधीपर्यंत टिकेल हे सांगणे कठीण आहे. कारण, अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा प्लॅन फ्लॉप करण्याची अभेद्य योजना आखली आहे. सपाने यापूर्वी, मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) गेम केला होता. आता हेच लक्ष्य महाराष्ट्रात भेदले जाणार आहे.

(हेही वाचा – Crime : घुसखोर बांगलादेशी महिलांसह ५ जणांना अटक; २५ वर्षांपासून होते बेकायदेशीर वास्तव्यास)

लोकसभा निवडणुकीत चुरशीची लढत देणाऱ्या समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे यूपीनंतर सपा महाराष्ट्रातही खेळ खराब करणार आहे. महाराष्ट्रात आपण एकहाती सरकार बनवू शकत नसलो तरी सरकार बनवण्यात किंवा फोडण्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे सपा नेते बोलून दाखवीत आहेत.

सपा नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुद्धा वाढले आहेत. अलीकडेच लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार रंग शारदा मध्ये घेण्यात आला होता. या सोहळ्याला यूपीचे ३१ खासदार उपस्थित होते. परंतु सपा प्रमुख आणि कन्नौज लोकसभा मतदारसंघाचे खासदार अखिलेश यादव आणि त्यांच्या खासदार पत्नी डिंपल आले नव्हते.

(हेही वाचा – Pune Crime: बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा डाव फसला, पुणे विमानतळावर दोघांना बेड्या)

महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार

समाजवादी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन केले. सध्या महाराष्ट्रात सपाचे अबू असीम आझमी आणि रईस शेख असे दोन आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने सात जागा लढविण्याची तयारी केली आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.