फरार गुप्ता बंधूंशी ठाकरेंचे व्यावसायिक संबंध; Sanjay Nirupam यांचा आरोप

165
फरार गुप्ता बंधूंशी ठाकरेंचे व्यावसायिक संबंध; Sanjay Nirupam यांचा आरोप

दिल्ली दौऱ्यावर गेलेले उद्धव ठाकरे दक्षिण आफ्रिकेतील फरार घोटाळेबाज व्यापारी गुप्ता बंधूंना भेटल्याचा दावा शिवसेना उपनेते, प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी सोमवारी (१२ ऑगसट) पत्रकार परिषदेत केला. तसेच या भेटीमागे व्यावसायिक संबंध आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळासाहेब भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगाटवरील निकाल आता १३ ऑगस्टला)

खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानी ठाकरेंनी ७ ऑगस्ट रोजी गुप्ता बंधू पैकी एकाची भेट घेतली, असा आरोप निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला. ठाकरे आजवर दिल्लीत गेल्यानंतर हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये थांबतात. मग यावेळी राऊत यांचे शासकीय निवासस्थानी का निवडले? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासावेत, अशी मागणी केली. कुख्यात गुंड असलेल्या गुप्तावर बाबा सहानी यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा ठपका आहे. याच गुंडाला ठाकरे भेटले. निवडणूक आयोगाने देगणी स्वीकारण्यास परवानगी दिल्यानंतर ठाकरेंनी घेतलेली भेट संशयास्पद असल्याचे निरुपम म्हणाले.

(हेही वाचा – #independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?)

राऊत यांनी पत्रा चाळ घोटाळ्यात बिल्डरांकडून मोठी दलाली मिळवली होती. यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. आताही सहानी सोबत किंवा गुप्ता बंधूंबरोबर राऊत यांचे काही संबंध आहेत का ? याचीही चौकशी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, ठाकरे आणि गुप्ता यांच्या भेटीचे कोणते पुरावे आहेत का, असा प्रतिप्रश्न विचारला असता, कोणतेही पुरावे नाहीत. सीसीटीव्ही तपासल्यानंतर सगळा प्रकार समोर येईल, असे सांगत सारवासारव केली. (Sanjay Nirupam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.