‘या’ प्राण्यांसाठी उभारणार प्रजनन केंद्र; CM Eknath Shinde यांनी दिले निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

112
CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता
CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता

राज्यात दुर्मीळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सोमवारी (१२ ऑगस्ट) मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबविण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घ्यावे. तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ‘क्लिनिक ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्याच्या सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्या.

(हेही वाचा – Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याची सुरक्षा केली कडक)

‘एक पेड माँ के नाम’ योजना प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री 

यावेळी पेंच येथे पानमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रान म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. दुर्मीळ होत चालेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यावेळी व्यक्त केला. गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती केली जावी याबाबत याबैठकीत चर्चा झाली.

जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची राज्यात जास्तीतजास्त जाणीवजागृती करावी. वृक्षारोपण केलेल्या रोपाचे संगोपन केले जावे यासाठी राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यात दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती असल्याचे सांगत त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. जंगलांमध्ये वैद्यकीय पर्यटनाला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मीळ वनस्पतींचे जतन देखील होईल, असा विश्वास शिंदे ( CM Eknath Shinde)यांनी बैठकीत व्यक्त केला. बैठकीत संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातील चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.