Fake Narrative Trap : आरक्षणावर ‘फेक नरेटीव्ह’च्या ‘ट्रॅप’मध्ये महायुती?

183
Fake Narrative Trap : आरक्षणावर ‘फेक नरेटीव्ह’च्या ‘ट्रॅप’मध्ये महायुती?

राज्यातील महायुती सरकारने सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग (SEBC) या प्रवर्गातून मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देऊनही ‘आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याच्या’ फेक नरेटीव्हच्या ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Fake Narrative Trap)

१० टक्के आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने आरक्षण अधिनियम २०२४ विधेयक मंजूर करून घेतले. यात मराठा समजाचाही विशेष उल्लेख करण्यात आला होता. हे आरक्षण २६ फेब्रुवारी २०२४ पासून शासकीय भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आले आहे.

(हेही वाचा – #independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?)

मराठा समाजाचा विशेष उल्लेख

या निर्णयानंतरही मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवले असून केवळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. त्याला काही मराठा समाजाच्या नेत्यांनीही विरोध केला आहे तसेच ओबीसी समाज आणि नेत्यांनीही कडाडून विरोध दर्शवला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असाच सूर सर्वपक्षीय नेत्यांचा होता, त्यानुसार १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊनही आता निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाने या प्रश्नावर राजकारण करीत ‘प्रश्न प्रलंबित’ असल्याचे नरेटीव्ह सेट केले आहे आणि त्यात महायुती अडकत आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. (Fake Narrative Trap)

.. तर जरांगे यांच्या आरोपातील धार कमी होईल

सत्ताधारी पक्षातील अनेक नेते जरांगे यांच्या आरोपावर खुलासे करण्यात आणि उत्तरे देण्यात वेळ घालवत असून त्याऐवजी १० टक्के आरक्षणाचा कायदा केल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बोलू लागले तर जरांगे यांच्या आरोपातील धार आपोआप कमी होऊन सामाजिक तेढ निवळण्यास मदत होईल, असे बोलाले जात आहे.

(हेही वाचा – #independenceday : देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश ब्रिटिशांनीच काढले?)

रोख महायुती मराठा आमदारांकडे

आता तर जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून प्रस्थापित मराठा उमेदवार पाडण्याची भाषा केली आहे, तर त्यांचा रोख हा महायुतीच्या आमदारांकडे असल्याचे दिसून येते. जरांगे यांच्यामागे शरद पवार असल्याचा आरोप महायुतीकडून वेळोवेळी करण्यात आल्याने यावर आता लोकांचा विश्वास बसू लागल्याचे दिसून येत आहे. (Fake Narrative Trap)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.