Munawar Faruqui याच्याकडून मराठी माणसाचा अवमान; मनसेचा विरोध

245
स्टॅन्ड अप कॉमेडियन Munawar Faruqui  हा कायम वादग्रस्त विधाने करून वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. त्यामुळे अनेक वाद उफाळून येत असतात. त्याने याआधी हिंदू देवदेवतांचा अवमान केला होता. त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला होता. त्याच्यावर २०२१ साली गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. आता त्याने मराठी माणसाचा अवमान केला आहे. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

काय म्हणाला फारुकी? 

मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) त्याच्या मुंबईत आयोजित स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारले की, तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहते का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आले आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर फारुकीने विचारले, कुठून आलात?”, तेव्हा समोरून उत्तर आले, तळोजा, मुंबईबाहेरून आलोय. यावर फारुकी म्हणाला, हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात. फारुकी  (Munawar Faruqui) एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकांना विचारले, तुम्ही कोकणी आहात का?, त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.