- सचिन धानजी,मुंबई
गोरेगाव आरे कॉलनीतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये खराब झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून त्या रस्त्यांच्या काम पुन्हा करून घेण्यास भाग घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. परंतु दोन महिन्यांपूर्वी बोरीवली पश्चिम येथील देवीदयाल रोडवरील अनिलभाऊ देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवलेल्या या रस्त्यावर तडे आणि त्याचा पृष्ठभाग खराब झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर या रस्त्याच्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित आहे. (CC Road)
मुंबई महापालिकेने अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात ४०० किलोमीटर लांबीचे रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरांतील तीन परिमंडळांसाठी प्रत्येकी एक आणि शहर व पूर्व उपनगरांसाठी एक एक अशाप्रकारे एकूण पाच कंत्राटदारांची निवड केली आहे. त्यातील परिमंडळ सातमधील बोरीवली पश्चिम भागातील देवीदास क्रॉस रोडवरील सिमेंट काँक्रिटचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेतले होते. हे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला. (CC Road)
(हेही वाचा – पराभवाच्या भितीपोटी ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका; Chandrashekhar Bawankule यांचा आरोप)
अदानी इलेक्ट्रीक कार्यालयासमोरील अनिलभाऊ देसाई मार्ग देवीदास रोडपासून प्रेम नगरपर्यंत जात असून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्यानंतर निल सोसायटी आणि निरधारा अपार्टमेंट समोरील भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे तसेच पृष्ठभाग वाहून गेल्याचे दिसत आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये आणि पहिल्याच पावसात या रस्त्यावर तडे पडल्याने तसेच रस्ता वाहून जात त्याची खडी दिसून येत असल्याने नक्की रस्ते कामाचा दर्जा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (CC Road)
मुंबईचे रस्त्यांची खड्डयांमधून सुटका करून मुंबईकरांना चांगल्या दर्जाचे रस्ते देण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहे. यासाठी चांगल्या आणि मोठ्या कंपन्यांची निवड केली जात आहे. परंतु हे सिमेंट काँक्रिटचे रस्ते दोन महिन्यांमध्ये खराब होऊ लागल्याने यापेक्षा डांबरी रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ येत आहे. जर चांगल्या प्रकारचे रस्ते बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात आणि कोट्यवधी रुपये बनवूनही जर रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणार असेल तर कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community