मराठवाड्यामध्ये ५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती; Uday Samant यांचे प्रतिपादन

121
‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ सह उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देणार; Uday Samant यांची माहिती

औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा शाश्वत विकासाची आर्थिक क्रांती घडवेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. चिकलठाणा मसिआ रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मसिआमार्फत करण्यात आले.

सामंत (Uday Samant) म्हणाले की, मराठवाड्यामध्ये एथर एनर्जी, लुब्रिजॉल, जेएसब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर यासारख्या उद्योग समुहांनी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शाश्वत विकास करण्याबरोबरच आर्थिक क्रांती घडवणारी ठरेल. लघुउद्योगास प्रोत्साहन यामुळे मिळेल. तसेच प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होतील. तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पूरक उद्योग विकासाला चालना मिळेल.

(हेही वाचा – ‘या’ प्राण्यांसाठी उभारणार प्रजनन केंद्र; CM Eknath Shinde यांनी दिले निर्देश)

सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले की, उद्योगासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी शासन घेत आहे. राज्याच्या या धोरणांमुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत मसीआ या उद्योग संस्थेच्या मार्फत मंत्री उदय सामंत (Uday Samant) व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. मानपत्र देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी क्रिकेटच्या स्टेडियमसाठी एमआयडीसीची जागा देण्याची मागणी केली असता लवकरच या जागेत बाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.