तुरुंगात्तील कैद्यांना (Prisoner) स्वादिष्ट जेवण मागविण्यासाठी अधिका-यांना लाच देवून कैद्दांना चिकन, मटण आणि चायनीज जेवण दिले जात असल्याचा व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात कारागृहातील कैद्दाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाडे तकार केली आहे. ही बातमी वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.
आता कारागृहातील कैद्यांना (Prisoner) दारु-बिअर-व्हिस्की-रम (लिकर) इत्यादी गोष्टी पुरविण्यात आल्यास अजिबातच नवल वाटणार नाही. तसेच कैद्यांनाही आपण कारागृहात आहोत, आपल्या हातून कोणताही गुन्हा घडलेला नाही, असे अजिबातच जाणवणार नाही. तसेच कारागृह हे आपले सेकंड होम आहे, असे कैद्दांना निश्चित वाटयला लागल्यास, याबाबतही कोणालाच यापुढे आश्चर्य तथा नवल वाटू नये. तसेच कैद्यांनाही कारागृहातून पळून तथा सूटून घरी लवकर जाण्याची अजिबातच घाई असणार नाही. कारण कैद्यांच्या (Prisoner) सर्व मुलभूत गरजाच जर कारागृहात पूर्ण होत असतील, तर त्यांनी तरी घरी का म्हणून जावे? कारागृह हेच आपले आता घर आहे, असे त्यांना वाटू लागल्यास, याबाबत कोणलाही आश्यर्च तथा नवल वाटण्याचे अजिबातच कारण नाही.
परंतु त्या तळोजा कारागृहात जो आमच्या भारत देशाचा तिरंगा फडकवतानाच फोटो जो दिसत आहे. ते पाहून आम्ही भारतीय नागरिकांनी यातून नेमके काय शिकावे तथा नेमका काय बोध घ्यावा? असा मला सर्वसामान्य नागरीक म्हणून आता प्रश्न पडलेला आहे. याबाबत कोणी जाणकार, सुज्ञ, तज्ञ किंवा कोणी सच्चा देशप्रेमी असतील तर त्यांनी आम्हा भारत देशातील गरीब जनतेला कोणी योग्य मार्गदर्शन करतील काय? यावरील तळोजा कारागृहातील अजब प्रकारे घडलेल्या घटनेवरून मी एक सामान्य नागरिक म्हणून आता हताश मनाने केवळ अभिमानाने एवढेच म्हणू शकतो फिरभी गर्वसे कहो, मेरा भारत महान!
– वसंत शामराव उटीकर.
Join Our WhatsApp Community