मराठा आरक्षण केंद्राचा विषय असल्याने Sharad Pawar आंदोलन थांबवण्याचा सल्ला देणार का? उमेश पाटील यांचा सवाल

150
मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असताना जरांगे पाटील आणि केरे पाटील हे राज्य सरकारच्या विरोधात करत असलेले आंदोलन थांबवण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांना देणार आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना बोलताना केला.
मनोज जरांगे पाटील आणि रमेश केरे पाटील हे मराठा आरक्षण ओबीसीतून देण्यासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत असल्याने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले असतानाच सोमवारी शरद पवार यांच्या वक्तव्यावर उमेश पाटील यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले. मराठा आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असताना महाराष्ट्रात मराठा आंदोलन का केले जात आहे, असा सवाल करतानाच हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयच नाही, अशा प्रकारचे मत शरद पवार यांचे झाले आहे का? तीही भूमिका शरद पवार (Sharad Pawar) यांनी तात्काळ जाहीर करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
मनोज जरांगे व रमेश केरे पाटील यांची मराठा समाजाबद्दल असणारी आस्था याबद्दल कुणालाही संशय नसून दोघांनीही व्यापक चळवळ महाराष्ट्रात उभी केल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आला आहे ही वस्तुस्थिती असल्याचेही पाटील यांनी यावेळी खास नमूद केले. मराठा व ओबीसी समाजाचे नेते यांच्यासह सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी शरद पवार यांची असेल तर त्याच्याशी आम्हीही सहमत आहोत. या बैठकीत लाईव्ह कॅमेरा ठेवून व मिडियाला घेऊन बैठक घेण्याचीही आमची तयारी आहे. मात्र त्या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच मराठा समाजाच्या नेत्यांची ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे ही जी मागणी आहे त्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडण्यात यावी असेही पाटील यावेळी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.