रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका सहकाऱ्याने दुसऱ्या सहकाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना कुर्ला पश्चिम येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. हत्येच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मारेकऱ्याला मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानकातून अटक करून आरोपीचा ताबा कुर्ला पोलिसांकडे देण्यात आला आहे.
सैद जाहिद अली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुस्लिम चक्कन अली असे मृत सहकाऱ्याचे नाव आहे. मूळचे उत्तर प्रदेश राज्यात राहणारे आरोपी आणि मृत दोघे धारावी एका गारमेंट कारखान्यात कामाला होते.आठ दिवसांपूर्वी दोघांनी धारावीतील नोकरी सोडून कुर्ला पश्चिम एलबीएस रोड वरील मुन्ना कंपाउंड येथे एका गारमेंट कारखान्यात कामाला लागले होते. रविवारी रात्री दोघे जण धारावी ९० फिट रोड येथे मद्यपान करून रिक्षाने कुर्ला पश्चिम एलबीएस रोड येथील महाराष्ट्र काटा येथे आले. (Crime)
(हेही वाचा – कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार; दिल्लीतील Doctor जाणार संपावर)
त्यानंतर दोघांत रिक्षाचे झालेले ३० रुपये भाड्यावरून वाद झाला. आरोपीने मृत मुस्लिम चक्कन अली याला भाडे देण्यास सांगितले, दोघात त्यावरून कडाक्याचे भांडण झाले, दरम्यान आरोपी याने रिक्षाचे भाडे दिले, व रिक्षा निघून गेल्यावर पुन्हा वाद होऊन आरोपी सैद याने रिक्षाला दिलेले पैशाची मागणी केली. मुस्लिम अली याने पैसे देण्यास नकार देताच आरोपी सैद याने मुस्लिमच्या कानशिलात लगावताच नशेत असलेला मुस्लिम याचा तोल जाऊन तो एका दगडावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. (Crime)
घाबरलेल्या सैद याने मध्यरात्री मालकाला फोन करून मुस्लिम हा नशेत पडला आहे, त्याच्या डोक्याला जखम झाली असे सांगून त्याने मोबाईल फोन बंद करून तेथून पळ काढला. मालकाने कुर्ला पोलिसांना कळवले असता पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मुस्लिम अली याला भाभा रुग्णालयत (Bhabha Hospital) येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी प्राथमिक तपासवरून मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन येथे पाठवुन त्याच्या सहकाऱ्याचा शोध सुरू केला. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५च्या पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असताना आरोपी हा गावी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा कक्ष ५ चे पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सपोनि.अमोल माळी आणि पथकाने तात्काळ कुर्ला टर्मिनस, कल्याण जंक्शन येथे पोलीस पथक पाठविण्यात आले. दरम्यान आरोपी सैद हा कल्याण रेल्वे स्थानकात मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून कुर्ला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सैद याला अटक केली. मंगळवारी त्याला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community