Shree Amma Yanger Ayyappan हे कोणत्या हिरोईनचं नाव आहे? आज आहे तिचा जन्मदिन

121
Shree Amma Yanger Ayyappan हे कोणत्या हिरोईनचं नाव आहे? आज आहे तिचा जन्मदिन
Shree Amma Yanger Ayyappan हे कोणत्या हिरोईनचं नाव आहे? आज आहे तिचा जन्मदिन

भारतीय चित्रपट सृष्टीची “पहिली महिला सुपरस्टार” म्हणून जी प्रसिद्ध झाली, ती आहे श्री अम्मा यंगर अय्यपन (Shree Amma Yanger Ayyappan) म्हणजेच चित्रपट सृष्टीतली अभिनेत्री श्रीदेवी. तिचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली झाला. चित्रपट सृष्टीसाठी तिने आपलं नाव श्रीदेवी असं ठेवलं होतं.

श्रीदेवी (Sridevi) ही एक भारतीय अभिनेत्री होती. तिने तिच्या अभिनय कारकिर्दीत तेलुगु, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

श्रीदेवीला (Sridevi) अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि तीन साऊथ फिल्मफेअर पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यापैकी दोन तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आहे. त्याचबरोबर श्रीदेवीला (Sridevi) नंदी पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं.

(हेही वाचा – BMC : महापालिका प्रशासनाचा प्रताप; एक कोटीच्या मशीनसाठी प्रत्येक वर्षी एक ते सव्वा कोटींचा खर्च)

श्रीदेवीची (Sridevi) चित्रपट सृष्टीतली कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षाही जास्त होती. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक वेगवेगळ्या शैलींचे चित्रपट केले. वैयक्तिक आयुष्यात श्रीदेवीचा स्वभाव मितभाषी आणि अंतर्मुख होता. पण तिने पडद्यावर मात्र चुलबुली, स्पष्टवक्ता व्यक्तिमत्व आणि कित्येकदा तर प्रबळ महत्वाकांक्षी असलेल्या स्त्रियांच्या भूमिका निभावल्या होत्या.

२०१३ साली श्रीदेवीला (Sridevi) पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच २०१३ साली झालेल्या CNN-IBN या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये श्रीदेवीला संपूर्ण शतकातली भारताची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडण्यात आलं होतं.

श्रीदेवीने १९६७ साली वयाच्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपट कंधन करुणाई मधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर १९६९ साली आलेल्या एम.ए. तिरुमुगम यांच्या पौराणिक तमिळ भाषिक असलेल्या थुनाइवन नावाच्या चित्रपटात लहानपणीच मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने १९७६ साली वयाच्या तेराव्या वर्षी मुख्य अभिनेत्री म्हणून मुंद्रू मुदिचू या तमिळ भाषिक चित्रपटात काम केलं.

(हेही वाचा – Crime : कुर्ल्यात रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादात सहकाऱ्याची हत्या)

१९७७ साली तिने १६ वयथिनिले, १९७८ साली सिगप्पू रोजक्कल, त्याच वर्षी आलेला पडहारेल्ला वायासू, १९८० साली प्रदर्शित झालेला वरुमायिन निरम शिवप्पू, १९८१ सालचा मीन्दुम कोकिला यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतली एक आघाडीची महिला स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

याव्यतिरिक्त तिने प्रेमाभिषेकम, वाझवे मायम, मुंद्रम पिराई, आखरी पोरतम, जगदेका वीरुडू अथिलोका सुंदरी आणि क्षण क्षणम या चित्रपटांतही काम केलं. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सोलवा सावन नावाच्या चित्रपटातून श्रीदेवीने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं होतं. पण एक अभिनेत्री म्हणून तिला खरी मान्यता १९८३ साली आलेल्या हिम्मतवाला नावाच्या ऍक्शन चित्रपटातून मिळाली.

त्यानंतर श्रीदेवीने मवाली, जस्टिस चौधरी, तोहफा, मकसद, मास्टरजी, कर्मा, मिस्टर इंडिया, वक्त की आवाज आणि चांदनी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत मुख्य भूमिका साकारली. तसंच तिने अभिनय केलेल्या सदमा, नगीना, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, गुमराह, लाडला आणि जुदाई या सर्व सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला खूप प्रशंसा मिळाली.

(हेही वाचा – CC Road : अनिल देसाई मार्ग गेला खड्ड्यात)

त्यानंतर पुढे काही काळ ब्रेक घेतल्यानंतर तिने मालिनी अय्यर नावाच्या टेलिव्हिजन सिटकॉममध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर पुढे श्रीदेवी कॉमेडी-ड्रामा इंग्लिश विंग्लिश नावाच्या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली.

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या मॉम नावाच्या थ्रिलर चित्रपटातर्फे तिने तिच्या करकीर्दीतला ३०० वा शेवटचा चित्रपट केला. श्रीदेवीने तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अगदी शेवटपर्यंत वाहवा मिळविली. तिने चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांच्यापासून तिला अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली झाल्या.

२४ फेब्रुवारी २०१८ साली दुबईमधल्या संयुक्त अरब अमिराती इथे असलेल्या जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेलमधल्या खोलीत बाथ टबमध्ये बुडून तिचा अपघाती मृत्यू झाल्याचं आढळून आलं. श्रीदेवीला (Sridevi) अभिनय क्षेत्रातल्या तिच्या योगदानासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मरणोत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.