Neeraj Chopra : नीरज चोप्रा जर्मनीला जातोय, कारण…

रौप्य पदक विजेत्या नीरज चोप्राचं भारतात आगमन त्यामुळे लांबलं आहे.

152
Neeraj Chopra : नीरज चोप्राची आता नजर ९० मीटरच्या भालाफेकीवर
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत रौप्य पदक जिंकलेला नीरज चोप्रा (Neeraj Chopra) जांघेच्या दुखापतीवर उपचार आणि डॉक्टरी सल्ला घेण्यासाठी जर्मनीला गेला आहे. त्यामुळे ऑलिम्पिकनंतर त्याचं भारतातील आगमन लांबलं आहे. कदाचित त्याला एखादी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. आणि तसं झाल्यास आगामी डायमंड्स लीग स्पर्धांमध्ये त्याला खेळता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील क्रीडा कार्यक्रम निश्चित करण्यापूर्वी नीरज जर्मनीला गेला आहे.

नीरज पॅरिसहून थेट जर्मनीला गेला असून तो महिनाभर तरी तिथे असेल, असं नीरजच्या निकटच्या कुटुंबीयाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. ‘नीरज डॉक्टरशी चर्चा करण्यासाठी जर्मनीला गेला आहे. आणि तिथे तो दीड महिना तरी असणार आहे. बाकी याविषयीचे फारसे तपशील मला माहीत नाहीत,’ असं ऑलिम्पिक पथकातील एका व्यक्तीने पीटीआयला सांगितलं आहे.

(हेही वाचा – Munawar Faruqui: मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा)

जांघेची दुखापत असतानाही २०२३ च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर तो अधे मध्ये विश्रांती घेतच खेळत होता. अलीकडे एका महिन्याच्या विश्रांतीनंतर तो ऑलिम्पिकपूर्वी दोन स्पर्धा खेळला. आता त्याला पायाच्या स्नायूची दुखापतही जडली आहे.

(हेही वाचा – मराठवाड्यामध्ये ५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती; Uday Samant यांचे प्रतिपादन)

२६ वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) यापूर्वीही दुखापतीसाठी जर्मनीतच वैद्यकीय सल्ला घेतला आहे. आणि ऑलिम्पिकच्या तयारीसाठीही तो सारब्रुकेन इथं महिनाभर थांबला होता. आता त्याला दुखापतीवरील उपाचाराबरोबरच सप्टेंबरच्या डायमंड्स लीग अंतिम फेरीतही खेळण्याची इच्छा आहे. आणि तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्याला २२ ऑगस्ट किंवा ५ सप्टेंबरला होणाऱ्या डायमंड्स लीग सामन्यांपैकी एका तरी सामन्यात खेळावं लागणार आहे. याविषयीचा निर्णय मात्र तो फिजिओ आणि जर्मन डॉक्टरशी बोलून घेईल.

डायमंड्‌स लीगमध्ये यावर्षी आतापर्यंत नीरज चौथ्या स्थानावर आहे. तो फक्त एकच स्पर्धा खेळला आहे. आणि अंतिम स्पर्धेसाठी लीग क्रमवारीतील सहा खेळाडू पात्र ठरतात. त्यामुळे हा चौथा क्रमांक टिकवणं नीरजसाठी महत्त्वाचं आहे. आणि ते एखाद्या स्पर्धेत खेळूनच होऊ शकतं. त्याचीच आखणी नीरज आता जर्मनीत बसून करेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.