Duleep Trophy : रोहित आणि विराट दुलीप करंडक खेळण्याची शक्यता

बांगलादेश मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दुलीप करंडक ही सरावाची संधी असेल

146
Duleep Trophy : रोहित आणि विराट दुलीप करंडक खेळण्याची शक्यता
Duleep Trophy : रोहित आणि विराट दुलीप करंडक खेळण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये जे बदल होतायत त्यातलाच एक बदल म्हणजे राष्ट्रीय संघातील खेळाडू आता नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसू शकतील. अगदी कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) आगामी दुलीप करंडक स्पर्धेत खेळताना दिसू शकतील. ५ ते २४ सप्टेंबर दरम्यान दुलीप करंडकाचे (Duleep Trophy) सामने होणार आहेत. आणि बांगलादेश मालिकेपूर्वी खेळाडूंची ही खरी कसोटी असेल.

फक्त रोहित आणि विराटच नाहीत तर शुभमन गिल, के एल राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, यशस्वी जयसवाल व सूर्यकुमार यादवही दुलीप करंडक (Duleep Trophy) खेळणार आहेत. वरिष्ठ तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा मात्र दुलीप कंरडकातही विश्रांती घेईल. भारतीय संघाचा आगामी व्यस्त कार्यक्रम पाहता तेज गोलंदाजांना पुरेशी विश्रांती देण्याची भूमिका संघ प्रशासनाने घेतली आहे. जसप्रीत बुमरा बांगलादेशविरुद्ध खेळेल की नाही हे देखील निश्चित नाही. चॅम्पियन्स करंडकापूर्वीच्या एकदिवसीय मालिका आणि ऑस्ट्रेलियातील मालिका यावर तो लक्ष केंद्रीत करणार आहे.

(हेही वाचा – Vinesh Phogat Returns : विनेश फोगाट मंगळवारी भारतात परतणार)

येत्या ४ महिन्यांत भारतीय संघ १० कसोटी सामने खेळणार आहे. आणि यात ऑस्ट्रेलियातील पाच कसोटींचाही समावेश आहे. दुलीप करंडकात (Duleep Trophy) पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण आणि उत्तर असे पाच विभागांचे संघ सहभागी होतात. त्यांच्यामध्ये ५ दिवसीय कसोटी सामने खेळवले जातात. रणजी करंडकानंतर ही स्पर्धा देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्वाची मानली जाते.

भारतीय संघ १९ सप्टेंबरला चेन्नईत बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यापूर्वी खेळाडूंची तयारी जोखण्यासाठी निवड समितीलाही ही एक संधी असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.