-
ऋजुता लुकतुके
देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करतानाच विस्तारा या प्रिमिअम श्रेणीच्या विमान कंपनीने प्रवाशांसाठी स्वातंत्र्य दिवसाचा सेल (Independence Day Sale) आणला आहे. आणि त्या अंतर्गत काही हवाई मार्गांवर अगदी १,५७८ रुपयांतही प्रवास करता येणार आहे. बागडोगरा ते दिब्रुगड दरम्यानचा एकमार्गी प्रवास हा १,५७८ रुपयांत करता येणार आहे. तर मुंबई ते अहमदाबाद या गर्दीच्या मार्गावर प्रिमिअम इकॉनॉमी दर्जाचं तिकीट २,६७८ रुपयांना उपलब्ध होईल.
याच मार्गावर बिझिनेस दर्जाचं तिकीट असेल ९,९७८ रुपये. तर आंतरराष्ट्रीय मार्गावर दिल्ली ते काठमांडू हे दुहेरी मार्गावरील तिकीट तुम्हाला ११,९७८ रुपयांना मिळेल. तर प्रिमिअम इकॉनॉमी तिकीटही ३,९७८ रुपयांत उपलब्ध असेल. आणि बिझिनेस दर्जाचं तिकीट हे ४६,९७८ रुपयांना मिळेल. (Independence Day Sale)
(हेही वाचा – Mumbai-Pune: आता लोणावळा टाळून पुण्याला जाता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार)
Celebrating India’s 78th Independence Day with the Freedom Sale!
Domestic one-way fares start at INR 1578 & International return fares start at INR 11978 all-in.
Book until 15-August-2024 for travel until 31-October-2024.— Vistara (@airvistara) August 9, 2024
(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्रा जर्मनीला जातोय, कारण…)
एअर विस्ताराची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा विमानतळांवर असलेली विस्ताराची तिकीट घरं इथं तिकिटं काढण्याची सोय असेल. याशिवाय ऑनलाईन तिकीट काढणारे मध्यस्थ आणि विस्तारा कॉल सेंटरवरही ही सवलत मिळू शकेल. एअर विस्ताराच्या थेट विमान सेवांवर ही सवलत लागू होईल. तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या बाबतीत अबूधाबी, बाली, बँकॉक, कोलंबो, दम्मान, ढाका, दुबई, दोहा, फ्रँकफर्ट, हाँग काँग, जेदाह, काठमांडू, लंडन, मॉल, मॉ़रिशस, मस्कत आणि सिंगापूर व पॅरिस या मार्गांवर थेट विमान सेवांसाठी सवलतीचा दर लागू होईल. प्रत्येक मार्गावरील तिकीट दर हे वेगवेगळे असतील. (Independence Day Sale)
प्रत्येक विमान फेऱ्यांमध्ये सवलतीची तिकिटं राखून ठेवण्यात आली आहेत. आणि तो कोटा भरला की, नियमित दरानेच तिकीट विक्री सुरू केली जाईल. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही सवलत मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community