उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षा रद्द केल्या जाणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे व यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसण्याची तयारी केली होती, अशा सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत.
काय आहे निर्णय?
त्या सोबतच सन 2020-21या शैक्षणिक वर्षांमध्ये शासकीय रेखा कला परीक्षा 2020 चे आयोजन केले जाणार नसून, कला शिक्षण प्रशिक्षण पदविका म्हणजे ए टी डी आणि मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन कोर्स) या दोन्ही अभ्यासक्रमांना 2020 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट देण्यात आली आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाने आज जीआर जारी केला आहे.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.१० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.#drawingexam
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2021
गुणांची होणार वाढ
2020-21 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी दहावीला बसले होते, त्या विद्यार्थ्यांना एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे अथवा ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता आले नाही, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी श्रेणी दिली जाणार आहे. यामुळे दहावीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांच्या गुणांची वाढ होणार आहे.
Join Our WhatsApp Community