AAP ला संजीवनी देण्यासाठी सिसोदिया सक्रिय

134
AAP ला संजीवनी देण्यासाठी सिसोदिया सक्रिय

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. तर नायब राज्यपाल आणि सरकारमध्ये संघर्ष सुरु असतो. यामुळे आपच्या (AAP) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया जामीन मंजूर झाल्याने तुरुंगाबाहेर आले. ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास दिल्ली सरकारचे कामकाज पुन्हा ट्रॅकवर येऊ शकेल, तसेच, आपलाही मोठे राजकीय बळ मिळेल, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

मागील १७ महिन्यांपासून सिसोदिया तुरुंगात होते. अटकेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनाही अटक झाली. केजरीवाल यांचे निष्ठावान सहकारी म्हणून सिसोदिया यांच्याकडे पाहिले जाते. केजरीवाल यांच्यानंतर सरकारमध्ये आणि पक्षातही सिसोदिया यांना स्थान दिले गेले. मात्र, दोघेही तुरुंगात असल्याने सरकारचे, पक्षाचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे मानले जाते. आता सिसोदिया यांच्या तुरुंगाबाहेर येण्याची घडामोड आपमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली आहे.

(हेही वाचा – Nandigram Express मधील मृत्यू प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल!)

सिसोदिया यांच्यामुळे होणार भार हलका 

राजीनामा देण्याआधी सिसोदिया तब्बल १८ विभागांची जबाबदारी सांभाळत होते, त्यामध्ये अर्थ, शिक्षण, आरोग्य, उत्पादन शुल्क या महत्त्वाच्या विभागांचाही समावेश होता. सिसोदिया यांच्यामुळे केजरीवाल बरेचसे निश्चिंत होते. ते पक्षकार्यासाठीही अधिक वेळ देऊ शकत होते. दोन्ही प्रमुख नेते तुरुंगात गेल्याने दिल्लीतील इतर मंत्र्यांवर आणि आपच्या (AAP) इतर नेत्यांवर मोठा भार पडणे साहजिकच होते. आता सिसोदिया यांच्यामुळे तो बऱ्याच प्रमाणात हलका होऊ शकतो.

घटनात्मक आणि तांत्रिक अडथळे न आल्यास सिसोदिया पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची पुरा स्वतःच्या खांद्यांवर घेऊ शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिसोदिया आप (AAP) साठी मोठा आधारस्तंभ ठरणार आहेत. हरियाणात पुढील दोन महिन्यांत निवडणूक होईल. तर, दिल्लीतील निवडणुकीसाठीही सहा महिन्यांचाच अवधी उरला आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आपने सुरू केली आहे. अशात सिसोदिया यांच्यासारखा प्रमुख नेता राजकीय मैदानात उत्तरल्यास त्या पक्षाचे मनोबल उंचावण्यास हातभार लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.