E-Bikes मुंबई पोलिसांच्या रडारवर; वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई

158
E-Bikes मुंबई पोलिसांच्या रडारवर; वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई

मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात ईलेक्ट्रिक बाईक्स (E-Bikes) चा वापर वाढला आहे. विशेषतः या ई-बाईक्सचा वापर डिलिव्हरीसाठी केला जात असून ई-बाईक्स चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून बेशिस्त ई-बाईक चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील तीन दिवसांत या विशेष मोहिमेत १ हजार १७६ चालकांवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – BJP च्या माजी नगरसेवकांना महापालिका प्रशासन काही भाव देईना…)

मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेस ई-बाईक्स (E-Bikes) चालक विशेषतः डिलेव्हरी बॉईज वाहतूकीच्या नियमांचा भंग करीत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या होत्या. या तक्रारीत ई-बाईक्स चालक वाहतूक नियमांचा भंग करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करीत असल्यामुळे त्या अनुषंगाने बेशिस्त ई-बाईक चालकांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी मुंबई वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

(हेही वाचा – Musical Theatre : संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर)

९ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२१ ई-बाईक चालकांवर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करून एकुण २९० ई-बाईक्स (E-Bikes) जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच विरूध्द दिशेने ई-बाईक चालविणे-२७२, सिग्नल जम्पींग-४९१, नो एन्ट्री-२५२ व स्थानिक गुन्हे (LAC)-१६१ अशा एकुण ११७६ ई-बाईक्सवर कारवाया करून एकुण १,६३,४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी अशाप्रकारे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे ई-बाईक्स चालक व डिलेव्हरी बॉईज् आढळून आल्यास मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाईनवर तक्रार करावी असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.