Narendra Modi सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार

250
Narendra Modi सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार
Narendra Modi सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (78th Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. यासह ते माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या विक्रमाला मागे टाकतील. कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर (Red Fort, Delhi) सलग दहा वेळा राष्ट्रध्वज फडकवला होता. (Narendra Modi)

(हेही वाचा – CC Road : दादरच्या समर्थ व्यायाम मंदिर मार्गाला तडे, दोन वर्षांतच झाली रस्त्याची दुरवस्था)

मात्र, लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. १९४७ ते १९६३ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते आणि सलग १७ वेळा तिरंगा फडकवला. यानंतर त्यांची कन्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सलग १६ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. (Narendra Modi)

(हेही वाचा – E-Bikes मुंबई पोलिसांच्या रडारवर; वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई)

यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला संकुलात होणाऱ्या कार्यक्रमासाठी ११ श्रेणींमध्ये १८ हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महिला, शेतकरी, युवक आणि गरीब वर्गातील ४ हजार विशेष पाहुणे असतील. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी या चार वर्गातील लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनाही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. (Narendra Modi)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.