स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीचा ‘संविधान वाचन’ उपक्रम; Sunil Tatkare यांची माहिती

178
महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; Sunil Tatkare यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या मुद्द्याचा जबर फटका बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे गुरुवारी (१५ ऑगस्ट) संविधान वाचन उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. ‘संविधान वाचन’ उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात आणि प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा देशाचा आत्मा आहे. धर्मनिरपेक्ष विचारधारेवर, नीतीमत्तेवर आम्हा सर्वांचा ठाम असा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हा संदेश संपूर्ण राज्यात देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Sunil Tatkare)

(हेही वाचा – E-Bikes मुंबई पोलिसांच्या रडारवर; वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई)

हा देश सर्वधर्मियांचा आहे. आपल्याला गीता, रामायण, बायबल, कुराण जसे प्रिय आहे तसेच आम्हा भारतीयांना संविधान प्रिय आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली येत्या १५ ऑगस्ट रोजी सामुदायिक संविधान वाचन करणार आहोत. त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे, मी मुंबई प्रदेश कार्यालयात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल गोंदियामध्ये तर नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करतील, अशी माहिती तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.