“देशवासियांकडून मला न्याय हवा आहे”, बांगलादेश सोडल्यानंतर Sheikh Hasina यांचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

166
"देशवासियांकडून मला न्याय हवा आहे", बांगलादेश सोडल्यानंतर Sheikh Hasina यांचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

राजीनामा देऊन ५ ऑगस्ट रोजी भारतात आश्रय घेतल्यानंतर हसिना (Sheikh Hasina) यांनी प्रथमच एका निवेदनाद्वारे जाहीर वक्तव्य केले आहे. ‘ज्यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान (Bangabandhu Sheikh Mujibur Rahman) यांचा अपमान झाला आहे. मी देशवासियांकडे न्याय मागत आहे.’ असं त्या म्हणाल्या आहेत. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे हे वक्तव्य त्यांचा मुलगा सजीद वाजेद यांच्या यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावर हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

“सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे”

हसिना (Sheikh Hasina) यांनी लिहिले आहे, की जुलैपासून बांगलादेशात अनेक विद्यार्थी, शिक्षक, पोलीस, पत्रकार, आपल्या अवामी लिग पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांचा हिंसाचार आणि अराजकतेमुळे जीव गेला आहे. हिंसेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच नव्या राजवटीने याची सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. नासधूस झाल्याप्रकरणी हसिना यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशी नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन केले.

“अंतरिम सरकारने केली 15 ऑगस्टची सुट्टी रद्द”

15 ऑगस्ट 1975 रोजी मुजीबूर रहमान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 15 ऑगस्टची सुट्टी रद्द केली आहे. हसीना यांनी निवेदनात म्हटले आहे की, “जुलैपासून आतापर्यंत आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड, जाळपोळ आणि हिंसाचारात अनेकांचे प्राण गेले आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पोलीस, अगदी पोलीस महिला, पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते, कष्टकरी लोक, अवामी लीग आणि संलग्न संघटनांचे नेते, कार्यकर्ते, प्रवासी आणि विविध संस्थांचे कार्यकर्ते या दहशतवादी हल्ल्यात मरण पावले. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करते आणि त्यांच्याप्रती शोक व्यक्त करतो. या हत्या आणि रानटीपणात सहभागी असलेल्या लोकांची योग्य चौकशी करून दोषींना शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे.” असं शेख हसीना निवेदनाद्वारे म्हणाल्या आहेत. (Sheikh Hasina)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.