“पुढची ५ वर्ष भयंकर…” परराष्ट्र मंत्री S Jaishankar यांची भविष्यवाणी

265
"पुढची ५ वर्ष भयंकर..." परराष्ट्र मंत्री S Jaishankar यांची भविष्यवाणी

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना जगात होणाऱ्या घटना लक्षात घेऊन तुम्ही भविष्याकडं कसं पाहाता? असा प्रश्न विचारण्यात आला. आगामी पाच ते दहा वर्ष अत्यंत कठीण आहेत, अशी भविष्यवाणी जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अमेरिकेलाही सुनावलं आहे.

“व्यापार अवघड होत आहे”
एस. जयशंकर (S Jaishankar) म्हणाले, “मी आशावादी व्यक्ती आहे. मी सहसा प्रश्नांचं उत्तर शोधतो. पण तरीही मी हे खूप गांभीर्यानं सांगतो की आपण सध्या अत्यंत खडतर काळातून जात आहोत.आगामी 5 वर्षांसाठी माझा अत्यंत गंभीर अंदाज आहे. तुम्ही मध्य पूर्व, युक्रेन, दक्षिण पूर्व आणि पूर्व आशियामध्ये होत असलेल्या घटनांकडं पाहात आहात. त्याचबरोबर कोव्हिडचा प्रभाव अजूनही कायम आहे. आपण कोव्हिडच्या त्या भयंकर कालखंडातून बाहेर पडलो आहोत. पण, आता त्याला हलक्यात घेत आहोत. तुम्ही जगातील आर्थिक आव्हानं पाहात आहात. त्याचा अनेक देश सामना करत आहेत. व्यापार अवघड होत आहे. त्याचबरोबर विदेशी चलन घटत चाललंय.”

अमेरिकेला प्रत्त्युत्तर 

जयशंकर (S Jaishankar) यांना अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीवरही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी अमेरिकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे. ‘भारतामध्ये या प्रकारच्या निवडणुका दरवर्षी होतात. आपण त्याचं सातत्यानं आयोजन करतो. आपल्याकडं नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. आपण दुसऱ्यांच्या निवडणुकीवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. त्याचबरोबर दुसराही आमच्याशी असाच वागेल ही आपली अपेक्षा असते.’ जयशंकर यांचा इशारा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेरिकेने दिलेल्या प्रतिक्रियेकडे होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेरिकेने धार्मिक मुद्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याला एस. जयशंकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.