सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १२वीच्या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी दहावीच्या निकालावर ३० टक्के, ११वी ३० टक्के आणि १२वीच्या अंतर्गत मूल्यमापनातून ४० टक्के असा फार्म्युला ठरवला आहे. गुरुवारी, १७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केंद्राने हा फॉर्म्युला न्यायालयाला कळवळा. याकरता सरकारने समिती स्थापन केली होती. 13 सदस्यांच्या समितीने आपला अहवाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
असे दिले जाणार गुण!
सरकारने स्थापन केलेल्या 13 सदस्यांच्या समितीने आपला अहवाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. समितीच्या अहवालानुसार शेवटच्या तीन वर्षांचा निकाल बारावीचा निकाल बनवण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहे. यामध्ये दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे उत्कृष्ट गुण घेऊन मार्कशीट तयार करण्यात येईल. तसेच अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेऊन वेटेज दिले जाईल. गुणपत्रिका तयार करताना बारावीच्या पूर्व-बोर्ड परीक्षेच्या आणि प्रॅक्टिकलच्या गुणांनाही वेटेज दिले जाईल. अशा प्रकारे निकाल दहावीच्या 30 टक्के, 11 वीच्या गुणांपैकी 30 टक्के आणि 12 व्या गुणांच्या 40 टक्के आधारावर 12 वीचा निकाल असेल.
(हेही वाचा : 10वी च्या विद्यार्थ्यांची मज्जा! या परीक्षेचे मिळणार अतिरिक्त गुण)
परीक्षेला पर्याय हवा असेल तर तोही द्या!
केंद्रीय शिक्षण मंडळ आणि राज्य सरकारांच्या बोर्डांच्या १२वीच्या परीक्षांसंबंधी एकूण ७ याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने आम्ही केंद्रीय शिक्षण मंडळाने परीक्षा ना घेण्याचा निर्णय स्वीकारला आहे. त्यात बदल करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. त्यासाठी जर विद्यार्थ्यांना अन्य पर्याय हवा असेल तर त्यांनी तो सोमवारी, २१ जूनपर्यंत न्यायालयासमोर मांडावे, असेही न्यायालयाने म्हटले.
२४ राज्यांत परीक्षा रद्द!
देशातील २४ राज्य शिक्षण मंडळांनी १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम, पंजाब, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेश या ४ राज्यांनी परीक्षा रद्द केल्या नाही. त्यांच्यावरही २१ जून रोजी पुढील सुनावणीच्या वेळी निर्णय घेऊ. केरळ राज्याला आम्ही आदेश देतो कि त्यांनी ११वीची परीक्षा रद्द करू नये, ती घेण्याविषयी कार्यवाही करावी, असेही न्यायालयाने म्हटले.
Join Our WhatsApp Community