Germany job opportunity : महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरीची संधी!

827
Germany job opportunity : महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरीची संधी!
Germany job opportunity : महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरीची संधी!

जर्मनीतील (Germany job opportunity) बाडेन वुटेनबर्ग (Baden Wuttenberg) या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत २५ फेब्रुवारी २०२४ रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानूसार जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहनचालक पुरविण्यात येणार आहेत. हे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपविली आहे. या निर्णयानुसार जर्मनीला मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था आणि कार्यपद्धती निश्चित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

जर्मनीतील कार्यालयास ‘महाराष्ट्र हाऊस’ नाव
या उपक्रमांतर्गत विविध 30 अभ्यासक्रमांना शासनाने मान्यता दिली असून इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषेच्या शिक्षणासह विविध संस्थांमधून कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील पथदर्शी प्रकल्पात 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या समन्वयाने विविध 30 ट्रेड निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला गती देण्याकरिता समन्वय साधण्यासाठी जर्मन शासनाच्या वतीने स्टुटगार्ट येथे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यालयास ‘महाराष्ट्र हाऊस’ असे नाव देण्यात आले आहे. (Germany job opportunity)

प्रसिद्धी फलक प्रदर्शित करण्यात येणार

याकरीता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तांत्रिक समिती स्थापन केल्या आहेत. यापैकी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये परिवहन आयुक्त हे सदस्य आहेत. तसेच उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेड निहाय तांत्रिक समिती स्थापन केल्या आहेत. यात परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी आणि जड वाहने ) या ट्रेडकरिता समिती स्थापन केली आहे. परिवहन विभागाने आपल्या अखत्यारीतील सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहक संघटना तसेच मोटार ड्रायव्हींग स्कूलना कळविण्यात येणार आहे. याबाबत प्रसिद्धी फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत. (Germany job opportunity)

जर्मन भाषा येणे अनिवार्य

यासाठी चालकास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यवाही ही शासनामार्फत देण्यात येणार आहे. उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे. जर्मनी आणि भारत या दोन्ही देशातील वाहनचालकांकरीता असलेले नियम आणि अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यामध्ये तफावत असून उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण (उदा. Left Hand Drive etc.) देण्याबाबतची कार्यवाही आणि खर्च देखील सरकार करणार आहे. (Germany job opportunity)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.