Ashwini Ponnappa : साईने कागदोपत्री जाहीर केलेली मदत मिळालीच नव्हती; बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाचा दावा

Ashwini Ponnappa : ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना किती मदत दिली याची आकडेवारी साईने जाहीर केली होती

157
Ashwini Ponnappa : साईने कागदोपत्री जाहीर केलेली मदत मिळालीच नव्हती; बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाचा दावा
Ashwini Ponnappa : साईने कागदोपत्री जाहीर केलेली मदत मिळालीच नव्हती; बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाचा दावा
  • ऋजुता लुकतुके

महिला बॅडमिंटन दुहेरीतील भारताची आघाडीची खेळाडू अश्विनी पोनप्पाने (Ashwini Ponnappa) पॅरिस ऑलिम्पिकमधील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण, खेळ सोडतानाच्या तिच्या आठवणी कटू असल्याचं तिच्याच एका मुलाखतीतून दिसून येत आहे. ‘ऑलिम्पिकची तयारी करत असताना क्रीडा मंत्रालयाकडून फारशी आर्थिक मदत मिळाली नाही. अगदी वैयक्तिक प्रशिक्षक बरोबर ठेवण्याची विनंतीही फेटाळण्यात आली,‘ असं अश्विनीने सांगितलं.

(हेही वाचा- Ind vs Ban, 1st ODI : भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना धरमशाला ऐवजी आता ग्वाल्हेरला)

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर किती खर्च केले याचा तपशील उघड केला आहे. यात अश्विनी पोनप्पाला (Ashwini Ponnappa) टॉप मोहिमेअंतर्गत साडेचार लाख रुपये आणि तिच्या वार्षिक स्पर्धा वेळापत्रकावर १ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. साईच्या या आकडेवारीवर अश्विनीने नाराजी व्यक्त केली आहे.

‘मला हवी होती ती वैयक्तिक मदत साईकडून मिळालीच नाही. ऑलिम्पिक तयारीसाठी खाजगी प्रशिक्षक आवश्यक होता. तो मला मिळालाच नाही. वर माझ्यावर किती पैसा खर्च झाला याची आकडेवारी मला पैसे दिले गेले असल्यासारखी मांडण्यात आली आहे. हे पैसे मला मिळालेले नाहीत. ते स्पर्धा आणि सरावावर खर्च झाले आहेत. त्याचा असा जाहीर ढिंढोरा पिटणं मला योग्य वाटत नाही,’ असं अश्विनीचं म्हणणं आहे. (Ashwini Ponnappa)

(हेही वाचा- Sanjay Raut : ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे खरे वारसदार रामदास आठवले’; निवडणुकीतील दोन नेते ‘हस्तक’ कोण?)

‘नोव्हेंबर २०२३ पासून मला टॉप योजनेत सहभागी करून घेण्यात आलं. तोपर्यंत मी एकटी सगळं काही करत होते. माझ्या प्रशिक्षकावरही मीच पैसे खर्च करत होते. आता सर्व काही साईने केल्याचा आव आणला जात आहे, हे पाहून मला धक्का बसला आहे,‘ असं अश्विनीचं म्हणणं आहे. (Ashwini Ponnappa)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अश्विनी, तनिषा कॅस्ट्रोच्या साथीने दुहेरीत सहभागी झाली होती. साखळीतच त्यांचा पराभव झाला. (Ashwini Ponnappa)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.