Jammu & Kashmir च्या डोडामध्ये चकमक! कॅप्टन दीपक हुतात्मा, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

192
Jammu & Kashmir च्या डोडामध्ये चकमक! कॅप्टन दीपक हुतात्मा, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu & Kashmir च्या डोडामध्ये चकमक! कॅप्टन दीपक हुतात्मा, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या (Jammu & Kashmir) डोडा (doda) येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी (Terrorist) लढताना भारतीय सैन्याचे कॅप्टन दीपक (Captain Deepak) हुतात्मा झाले आहेत. सैन्य दलाच्या पथकाने या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे. दहशवाद्यांची गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते. चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ते हुतात्मा झाले.

दिल्लीत तातडीची उच्चस्तरीय बैठक
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, असार वन परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. दहशतवादी जंगलात एका नदीजवळ लपून गोळीबार करत आहेत. सकाळी झालेल्या चकमकीदरम्यान ते पळून गेले होते, तिथून तीन बॅगमध्ये एम-4 रायफल आणि काही स्फोटकेही सापडली आहेत. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांवर संरक्षणमंत्र्यांनी दिल्लीच्या साउथ ब्लॉकमध्ये तातडीची बैठक बोलावली. एनएसए अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख यात सहभागी झाले होते. बैठकीची माहिती समोर आलेली नाही. (Jammu & Kashmir)

सुरक्षा दल हाय अलर्टवर
स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जम्मू भागात 3000 हून अधिक लष्कराचे जवान आणि 2000 बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दहशतवादाचा सामना करण्यासाठी आसाम रायफल्सचे सुमारे 1500-2000 सैनिकही तैनात केले जात आहेत. (Jammu & Kashmir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.