Congress : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस (Congress) पक्ष तिकीट देणार नसल्याचे समजते. याबाबतच्या सूचना काँग्रेस हायकमांडने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांना दिल्या होत्या.

164

नुकतेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला (Congress) धक्का बसला. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. अशा वेळी त्यातील २ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी आले. यामध्ये हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर अशी या दोन आमदारांची नावे आहेत.

पाचही आमदारांना काँग्रेस पक्ष तिकीट देणार नसल्याचे समजते

त्यामुळे आता काँग्रेसचे (Congress) हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस (Congress) पक्ष तिकीट देणार नसल्याचे समजते. याबाबतच्या सूचना काँग्रेस हायकमांडने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांना दिल्या होत्या.

(हेही वाचा राजस्थान उच्च न्यायालयाकडून Asaram Bapu यांना 11 वर्षांनंतर 7 दिवसांचा पॅरोल)

आमदारांकडून नवे पर्याय शोधण्यास सुरुवात

क्रॉस वोटिंगच्या आरोपामुळे ज्या आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून (Congress) युवा चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान आमदारांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मी काँग्रेससोबत होतो आणि आगामी काळातही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे, असा दावा हिरामण खोसकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे, जितेश अंतापूरकर यांनीही पक्षांतराच्या चर्चा फेटाळल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.