Bangladesh Violence : बांगलादेशात आता दहशतवादी संघटनांना मिळाले मोकळे रान; कोणत्या संघटना झाल्यात सक्रिय?

बांगलादेशातील दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे नियंत्रण आहे.

208
बांगलादेशात अराजकतेनंतर (Bangladesh Violence) आणि सत्तांतरानंतर आता येथे दहशतवादी संघटना सक्रिय होण्याची शक्यता दाट बनली आहे. कारण देशातील अंतरिम सरकार देशातील दहशतवादी संघटना मोकळे रान देण्याची शक्यता आहे. या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे पाठबळ मिळत असल्याचे माहिती आहे. देशात झालेल्‍या हिंसाचारामागेही दहशतवादी संघटना कार्यरत असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे नियंत्रण 

पाकिस्‍तानमधील लष्‍कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ईशान्‍य भारतातील राज्‍यांमध्‍ये दहशतवादी कारवाया करण्‍यासाठी बांगलादेशमधील ‘अन्‍सारूल्ला बांगला टीम’ (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केल्‍याचीही माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांना बांगलादेशातून पळवून लावण्‍यामागे पाकिस्‍तानच्‍या आय.एस.आय. या गुप्‍तचर यंत्रणेने महत्त्वाचा हात असल्‍याचेही समोर येत आहे. ‘एबीटी’सह जमात-ए-इस्‍लामी आणि इतर संघटना यांच्‍याशी आय.एस्.आय.चा थेट संपर्क होता, असे सांगण्‍यात येत आहे. भारतात कारवाया करण्‍यासाठी लष्‍कर-ए-तोयबा आणि एबीटी या संघटनांनी वर्ष २०२२ मध्‍ये एकत्र येऊन बांगलादेशामध्‍ये तळ स्‍थापन केला होता. वर्ष २०२२ मध्‍ये त्रिपुरामध्‍ये एका मशिदीची तोडफोड झाल्‍याचे वृत्त समोर आल्‍यानंतर तेथील हिंदूबहुल भागांना लक्ष्य करण्‍यात आले होते. त्‍याच वर्षी त्रिपुरामध्‍ये एबीटी संघटनेचे ५० ते १०० दहशतवादी घुसखोरी करण्‍याचा प्रयत्न करत होते, अशीही माहिती समोर आली होती. आसामध्‍येही कारवाया करण्‍याच्‍या सिद्धतेत असलेल्‍या एबीटीच्‍या काही लोकांना अटक करण्‍यात आली होती. (Bangladesh Violence)

(हेही वाचा Bangladesh Violence : हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पॅरिसमध्ये हजारो हिंदू उतरले रस्त्यावर)

बांगलादेशमधील कार्यरत दहशतवादी संघटना

अन्‍सारूल्ला बांगला टीम, अन्‍सार अल-इस्‍लाम, लष्‍कर-ए-तोयबा, हरकत-उल-जिहाद अल-इस्‍लामी बांगलादेश, जागराता मुस्‍लिम जनता बांगलादेश, जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश, पुरबा बांगलार कम्‍युनिस्‍ट पार्टी, इस्‍लामी छात्र शिबिर, इस्‍लामिक स्‍टेट.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.