पॅरिस ऑलिम्पिकनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त झालेला भारतीय गोलकीपर पी आर श्रीजेशने (P R Sreejesh) निवृत्तीनंतर काय करणार याचं सुतोवाच केलं आहे. राहुल द्रविडची पद्धत आपल्याला आवडली असं सांगत त्याने ज्युनिअर खेळाडूंना मार्गदर्शन करत करत ज्येष्ठ खेळाडूंकडे वळण्याचा त्याचा इरादा आहे. राहुल द्रविडनेही बीसीसीआयबरोबर बोलणी करतानाच प्रशिक्षक पदाचा आपला कार्यक्रम ठरवला होता. १९ वर्षांखालील संघाबरोबर सुरुवात करून तो भारतीय ए संघातील खेळाडूंबरोबर मेहनत घ्यायला लागला. त्यानंतर भारतीय संघाची प्रशिक्षक पदाची धुरा त्याने हाती घेतली.
श्रीजेश (P R Sreejesh) आणि द्रविड या दोघांना द वॉल म्हटलं जातं. आता खेळ सोडल्यावरही दोघांचे विचार सारखेच असल्याचं दिसत आहे. श्रीजेश आधी उगवत्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. २०३२ च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिक पर्यंत तो राष्ट्रीय संघाकडे वळलेला असेल, असं दिसतंय. ‘मला सुरुवातीपासून प्रशिक्षक व्हायचं होतं. पण, आता प्रश्न आहे कधी व्हायचं. कारण, निवृत्तीनंतर कुटुंबीय जास्त महत्त्वाचे असतात. आता त्यांच्याशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेईन.’ असं श्रीजेशने पीटीआयसी बोलताना सांगितलं.
VIDEO | @ 𝟒 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭 𝐒𝐭𝐫𝐞𝐞𝐭: “I think in the team… all the 11 members have played in the same scenario before and this was like a second opportunity. But definitely, before leaving for Paris, the team had that kind of confidence of being capable of winning… pic.twitter.com/O9iPjkVSrX
— Press Trust of India (@PTI_News) August 13, 2024
(हेही वाचा – Bangladesh Violence : बांगलादेशात आता दहशतवादी संघटनांना मिळाले मोकळे रान; कोणत्या संघटना झाल्यात सक्रिय?)
जर प्रशिक्षक होण्याचा निर्णय श्रीजेशने (P R Sreejesh) घेतला तर नेमकं काय करायचं हे त्याचं पक्कं आहे. ‘राहुल द्रविडचं उदाहरण मला इथं योग्य वाटतं. त्याने ज्युनिअर खेळाडूंबरोबर आधी काम केलं. मग तेच खेळाडू मोठे होतात तेव्हा देशासाठी खेळतात. आणि तेव्हा तुम्ही तिथे असाल तर सगळ्यांचाच फायदा होतो. निकाल चांगले लागू शकतात. यंदा ज्युनिअर विश्वषक आहे. आणि तिथपासूनच सुरुवात करता येईल,’ असं आश्वासक उत्तर श्रीजेशने दिलं आहे.
३६ वर्षीय श्रीजेशने (P R Sreejesh) यंदाचं ऑलिम्पिक गाजवताना पहिल्या बाद फेरीत इंग्लंड विरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक वाचवले होते. संबंध ऑलिम्पिकमध्ये त्याची कामगिरी दमदार झाली आणि त्याने भक्कम बचाव केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community