Fire Police Medal : महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

145
Fire Police Medal : महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना 'अग्निशमन सेवा पदक'

७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Fire Police Medal)

‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष २०२४ साठी ५९ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६ अग्निशमन जवानांचा समावेश आहे. शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल एक जवान – संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक; तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

(हेही वाचा – Maharashtra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंच्या लढाईत कोणाचा फायदा होणार ?)

देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’; ४ कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि ५५ कर्मचार्‍यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील ६ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील १४ कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे ०३ कर्मचारी/स्वयंसेवक आणि ११ कर्मचारी/स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली. (Fire Police Medal)

(हेही वाचा – MMRC : मुंबई मेट्रो-३ प्रकल्पात ६७९ झाडे वाचवली; झाडे लावण्यासाठी सुमारे १२ कोटींचा खर्च)

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिकाऱ्यांची नावे –

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक – संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) – अग्निसेवा पदक

किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी, अनंत भिवाजी धोत्रे, उप अधिकारी, मोहन वासुदेव तोस्कर, आघाडीचे फायरमन, मुकेश केशव काटे, लीडिंग फायरमन आणि किरण रजनीकांत हत्याल, अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) – नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) – नागरी संरक्षण पदक

नितीन भालचंद्र वयचल, प्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधव, जेलर ग्रुप-१, दीपक सूर्याजी सावंत, सुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघ, हवालदार यांचा समावेश आहे. (Fire Police Medal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.