independence day quotes : स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा; काय आहे स्वातंत्र्याचे महत्त्व?

209
independence day quotes : आपल्या प्रियजनांना पाठवा स्वातंत्र्यदिनाचे quotes

१५ ऑगस्ट २०२४ हा आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी जो संघर्ष केला याची माहिती विद्यार्थ्यांना व मुलांना मिळाली पाहिजे. स्वातंत्र्यदिन साजरा करणे म्हणजे केवळ औपचारिकपणे ध्वजारोहण करणे नाही तर स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेणे आणि हुतात्म्यांच्या योगदानाचे स्मरण करणे देखील महत्त्वाचे आहे. (independence day quotes)

लाल किल्ल्यावर दरवर्षी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची परेड होते. एवढेच नाही तर शाळकरी मुले रंगीबेरंगी कपडे घालून विविध कार्यक्रम सादर करतात. भारताचे पंतप्रधान दरवर्षी ध्वज फडकवतात आणि लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भाषण देतात. विविध शाळा आणि संस्थांद्वारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. (independence day quotes)

(हेही वाचा – Love Jihad : उल्हासनगरमधील दृष्टी झाली आयेशा; धर्मांतरासाठी मुसलमानांनी गाठली खालची पातळी )

आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल माहिती आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी प्रचंड संघर्ष करुन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या दिवशी आपण त्या सर्वांचे स्मरण केले पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी लढा दिला. त्यांच्यामुळेच आपण सर्व जण मोकळा श्वास घेतो आणि आपले मूलभूत अधिकार उपभोगतो. (independence day quotes)

भारत हा असा देश आहे जिथे विविध भाषा, परंपरा आणि संस्कृतीचे कोट्यवधी लोक एकत्र राहतात आणि स्वातंत्र्यदिनाचा हा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. या दिवशी, भारतीय म्हणून, आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि वचन दिले पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या आक्रमण किंवा अपमानापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमीच सज्ज राहू. (independence day quotes)

(हेही वाचा – Fire Police Medal : महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’)

स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने काही लोक देशभक्तीपर चित्रपट पाहतात, काही लोक लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या सोहळ्याचे टेलिकास्ट टीव्हीवर पाहतात, तर काहीजण एकमेकांना मिठाई वाटून स्वातंत्र्यदिन साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करुन आणि हर घर तिरंगा ही मोहिम राबवून पुन्हा एकदा भारतीयांना एकत्र आणले आहे. (independence day quotes)

तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.