Hindenburg vs SEBI : हिंडेनबर्ग अहवालातील एक कंपनी मॉरिशसमध्ये नसल्याचा तिथल्या सरकारचा निर्वाळा

Hindenburg vs SEBI : माधवी पुरी-बूच यांच्यावर आरोप करताना मॉरिशसमधील एका कंपनीचा उल्लेख हिंडेनबर्ग यांनी केला होता.

132
Hindenburg vs SEBI : हिंडेनबर्ग अहवालातील एक कंपनी मॉरिशसमध्ये नसल्याचा तिथल्या सरकारचा निर्वाळा
  • ऋजुता लुकतुके

हिंडेनबर्ग विरुद्ध सेबी अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांच्यातील वादात आता हिंडेनबर्गच्या अहवालातील काही विसंवादी मुद्दे समोर येत आहेत. माधवी पुरी-बूच यांची कंपनी असल्याचा दावा या अहवालात केलेल्या कंपनीचं अस्तित्व मॉरिशसने नाकारलं आहे. आपल्याकडे अशी कुठलीही कंपनी नाही. शेल कंपन्यांना मॉरिशसमध्ये थारा नाही, या शब्दांत मॉरिशसमधील अर्थविषयक यंत्रणेनं हिंडेनबर्गला उत्तर दिलं आहे. त्यामुळे सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी – बूच यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Hindenburg vs SEBI)

(हेही वाचा – Oil Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत मोठी धट, ब्रेंट क्रूड ८० डॉलरवर)

‘हिंडेनबर्ग यांनी १० ऑगस्टला जाहीर केलेला अहवाल आम्ही पाहिला आहे. यात मॉरिशसमधील काही शेल कंपन्यांचा हवाला देण्यात आला आहे. तसंच मॉरिशस हे करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी नंदनवन असल्याचं म्हटलं आहे. पण, आम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की, अहवालात नोंद असलेली कंपनी मॉरिशसमधील नाही. मॉरिशस शेल कंपन्यांना थारा देत नाही,’ असं मॉरिशसने पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. (Hindenburg vs SEBI)

(हेही वाचा – Independence Day : भारतच नव्हे, १५ ऑगस्ट रोजी ‘हे’ देशही साजरा करतात स्वातंत्र्य दिन)

हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानुसार माधवी पुरी-बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी सिंगापूरमधून एक बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत ते मॉरिशसमध्ये एका वेल्थ क्रिएशन कंपनीच्या मार्फत तिथल्या ऑफ-शोअर फंडांत ते गुंतवणूक करत होते. यावर मॉरिशसने ही सफाई दिली आहे. मॉरिशसमधील फंड हा सरकारी फंड असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मॉरिशसमधील हा फंड अदानी समुहामार्फत चालवण्यात येत होता. असा दावा हिंडेनबर्ग यांनी केला होता. तोच आता मॉरिशसने फेटाळला आहे. वित्तविषयक आंतरराष्ट्रीय कायदे, नियम यांचं काटेकोर पालन मॉरिशसने केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. (Hindenburg vs SEBI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.