MNS: वरळीत हर घर मनसे मिशन, देशपांडे यांची किमया आदित्यला रंग दाखवणार 

439
MNS: वरळीत हर घर मनसे मिशन, देशपांडे यांची किमया आदित्यला रंग दाखवणार 
MNS: वरळीत हर घर मनसे मिशन, देशपांडे यांची किमया आदित्यला रंग दाखवणार 

सचिन धानजी, मुंबई 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या वतीने मुंबईतील शिवडी विधानसभा (Shivdi Assembly) क्षेत्रामध्ये माजी आमदार, माजी मंत्री बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये अद्याप मनसेचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी संभाव्य उमेदवार म्हणून पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच मनसेचे संदीप देशपांडे हे उबाठा शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना टक्कर देतील अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. परंतु या विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेचा उमेदवार कोण असेल याबाबत पक्षाच्या वतीने नाव जाहीर झालेले नसले तरी वरळी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास हर घर मनसे पोहचवण्यास देशपांडे यांनी सुरुवात केली आहे. मी आमदार नसलो तरीही… असे सांगत देशपांडे हे लोकांच्या समस्या आता घरोघरी जाऊन जाणून घेत आहेत. त्यामुळे देशपांडे यांची किमया आगामी निवडणूकीत आदित्य ठाकरेंना रंग दाखवणार असेच चित्र वरळीत निर्माण होताना दिसत आहे. (MNS)

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सन २०१९ च्या माहीम-दादर विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. मनसेने माजी आमदार नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. पण या निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर हे ६१ हजार मते घेऊन विजयी झाले. तर संदीप देशपांडे यांना ४२ हजार एवढी मते मिळाली होती. मात्र या निवडणुकीत देशपांडे यांचा पराभव झाल्यानंतर या मतदारसंघाऐवजी मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांनी वरळी विधानसभेची जबाबदारी देशपांडे यांचेकडे सोपवली. आणि देशपांडे यांच्या शिफारशी वरून विधानसभा विभाग प्रमुख म्हणून संतोष धुरी यांची नेमणूक करून या दोघांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वरळी विधानसभेची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. (MNS)

(हेही वाचा – नसीम खान यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचेच आव्हान, Varsha Gaikwad यांची साथ कुणाला असणार?)

या विधानसभेमध्ये सध्या माजी मंत्री उबाठा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. तसेच विभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदे हे दोन विधान परिषदेतील सदस्य आहेत. त्यामुळे या दोन्ही विधान परिषद सदस्यांचा आमदार विकास निधी आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आमदार विकास निधी अशा प्रकारे तीन आमदारांचा विकास निधी  वापरून या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करूनही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना केवळ ६७१५ मताची आघाडी घेता आली.  या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना ५८ हजार १२९ मते मिळाली तर उबाठा शिवसेनेचे अरविंद सावंत यांना ६४ हजार ८४४ मते मिळाली. त्यामुळे खुद्द आदित्य ठाकरे आणि दोन विधान परिषदेतील सदस्य असे तीन आमदार एकाच विधानसभा क्षेत्रात काम करूनही उबाठा शिवसेनेला या मतदार संघात अधिकच मताधिक्य घेता आलेला नाही. (MNS)

मनसे पक्ष हा स्वतंत्र लढणार की महायुती सोबत राहणार याबाबत अजून स्पष्टता नसल्याने मनसे पक्षाने स्व: बळाचा नारा देत विधान सभेचे दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा केली. मात्र वरळी मतदार संघात मनसेच्या वतीने जोरदार बांधणी सुरू असून या मतदार संघाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्याकडे सोपवल्याने  ते सध्या वरळीतच ठाण मांडून बसले आहेत. सकाळी दादरची शाखा आणि संध्याकाळी वरळीतील शाखा असा दिनक्रम ठरवून देशपांडे हे संतोष धुरी, उत्तम सांडव यांच्या मदतीने प्रत्येक शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष तसेच मनसैनिक यांच्या मदतीने प्रत्येक इमारत, चाळ, वाडी, वस्ती येथे घरोघरी जावून लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. मैदान, उद्यान, रूग्णालय,दवाखाना तसेच कोळीवाडा आदी पालथे घालून तेथील समस्या जाणून घेत त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या माध्यमातून सरकारच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या वरळीत देशपांडे यांचीच हवा पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुती सामील झाल्यास किंवा स्वबळावर लढल्यास वरळीचा मतदार संघात मनसेची टक्कर आदित्य ठाकरे यांना असेल असे स्पष्ट दिसून येत आहे. (MNS)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.