कुर्ल्यातील मोहम्मद कलिम चौधरी या ड्रग्ज माफियाला २ कोटींच्या एमडी या ड्रग्जसह ऐरोली टोल नाक्यावर अटक करण्यात आली आहे. त्याचे दोन साथीदार पळून गेले असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुलुंडच्या नवघर पोलिसांनी मंगळवारी रात्री नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली असून या तिघांविरुद्ध ‘एनडीपीएस’ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
(हेही वाचा – Hindenburg vs SEBI : हिंडेनबर्ग अहवालातील एक कंपनी मॉरिशसमध्ये नसल्याचा तिथल्या सरकारचा निर्वाळा)
मुलुंड पूर्व नवघर पोलिसांनी मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ऐरोली टोल नाका येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान निळ्या रंगाची मारुती सुझुकी बलोनो ही मोटार काही अंतरावर थांबली होती, व त्यातून दोन इसम संशयास्पदरित्या बाहेर पडले. त्यानंतर ही मोटार ऐरोली टोल नाका ओलांडून जात असताना नवघर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ही मोटार नाकाबंदीत अडवली, मोटारीची झडती घेतली असता पोलिसांना मोटारीत पांढऱ्या रंगाची संशयास्पद पावडर मिळाली. (Crime)
(हेही वाचा – नसीम खान यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचेच आव्हान, Varsha Gaikwad यांची साथ कुणाला असणार?)
दरम्यान चालक मोहम्मद कलिम चौधरी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला नवघर पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता पांढऱ्या रंगाची पावडर ही मेफेड्रोन (MD) असल्याची कबुली त्याने दिली, व त्याने साकीब आणि आणखी अनोळखी सहकाऱ्यासह एमडी कल्याण येथून घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईकडे जात होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. नवघर पोलिसांनी एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून मोहम्मद कलिम चौधरीला अटक करण्यात आली. दरम्यान कुर्ला सुंदरबाग येथून साकीब याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community