Congress : काँग्रेसवर मुस्लिम नाराज!

170
Congress : काँग्रेसवर मुस्लिम नाराज!

लोकसभा निवडणुकीत डावलल्यानंतर काँग्रेसमधील (Congress) मुस्लिम समाजात नाराजीचा सूर ऐकू येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही नुकतीच ही नाराजी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांसमोरच उघडपणे व्यक्त केली.

नसीम खान डावलून गायकवाडांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान यांना डावलून मुंबई दक्षिण-मध्य या लोकसभा मतदार संघातील आमदाराला उमेदवारी देण्यात आल्याने खान यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपण निवडणुकीत काम करणार नाही, असेही जाहीर केले होते. दरम्यान, काँग्रेस (Congress) प्रभारी चेन्निथला यांनी त्यांची समजूत काढून त्यांचे योग्य ठिकाणी राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर खान यांनी प्रचारात सहभाग घेतला.

(हेही वाचा – Crime : कुर्ल्यातील मोहम्मद कलिम चौधरीला २ कोटींच्या ड्रग्जसह अटक)

अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व द्या

नसीम खान यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक विभाग मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या पाठाशी उभा राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाने सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समुदायाला योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे,” अशा शब्दांत खान यांनी पक्षाच्या नेत्यांना सुनावले.

सोमवारी, १२ ऑगस्ट २०२४ ला विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक व मराठवाड्यातील खासदार यांचा सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चेन्निथला यांच्यासोबत व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, खासदार कल्याण काळे, शिवाजी काळगे यांच्यासमोरच खान यांनी उघड नाराजी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.