राज्यातील शिधावाटप (Ration) दुकानदारांना ई – पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे धान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून ई पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबंधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी आणि क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही विभागाने दिली आहे. (Ration)
(हेही वाचा Love Jihad : उल्हासनगरमधील दृष्टी झाली आयेशा; धर्मांतरासाठी मुसलमानांनी गाठली खालची पातळी )
ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै आणि ऑगस्ट २०२४ या महिन्यासाठी अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिल्या आहेत. (Ration)
Join Our WhatsApp Community