78th independence day : पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

105
78th independence day : पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
78th independence day : पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावर पोहोचले असून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच स्वागत केलं. आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची पंतप्रधान मोदी यांची ११ वी वेळ आहे. (78th independence day)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असं त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे त्यांनी आवाहन केले. (78th independence day)

“तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करूया. जय हिंद ! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली वाहतो आणि त्यांचे स्वप्न साकारण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. जय हिंद!” असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (78th independence day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.